नेकनूर चा आठवडी बाजार चोरांना आंदन
नेकनूर चा आठवडी बाजार चोरांना आंदन

पोलिस ठाण्याच्या अर्थपूर्तीत नेकनूरच्या बाजारात खिसेकापू ,मोबाईल चोर मोकाट

नेकनुर ।  दि 27 (रामनाथ घोडके)

सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेकनूर च्या रविवारच्या बाजाराला चोरांनी लक्ष केले आहे. मागील काही दिवसांपासून नेकनूर चा आठवडी बाजार खिसेकापू आणि मोबाईल चोरांसाठीच भरतोय की काय असे दिसून येत असतांना या कडे मात्र नेकनूर ठाणे प्रमुख दुर्लक्ष करत असल्याने खिसेकापू मोबाईल चोर मोकाट फिरत आहेत. या सोबत महिलांच्या गळ्यातील सोने चोरी सोबतच शेतकऱ्यांचे खीसे रिकामे करण्याच्या घटना घडल्याने नागरिक हैराण असले तरी पोलिस मात्र अर्थकारणात गुंतल्याचे पाहायला मिळते.

आठवडी बाजारात दूरवरून खरीददार येतात . कोंबड्या, शेळ्या, गाय, बैल, आदींची बाजारात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरू असते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चोरट्यांनी लक्ष केल्याची घटना मागील काही दिवसांन पासून सातत्याने घडत आहेत. मोबाईल , सोने , खिसेकापू चोर बाजारात , बस स्थानक, बँक, शिक्षक कॉलनी या भागात चोरी करून पसार होण्याच्या अनेक घटना घडल्या असल्या तरी यावर प्रतिबंध करण्यास पोलिसांना अजूनही वेळ मिळाला नसल्याने

गत आठवड्यात रविवारच्या बाजारातून दोन चार मोबाईल चोरी गेले . तक्रार देऊन ही काहीच होत नाही उलट तक्रारदारांना सल्ले देऊन गप्प करण्यात पोलीस तरबेज झाल्याने अनेक तक्रारी कागदावर येत नाही लत . यामुळे चोरांना बाजार आंदन दिला की काय असा प्रश्न उपस्थित होतो.बाजारात या घटना नित्य घडत असल्या तरी पोलिस मात्र अर्थकारण असणाऱ्या ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसत आहेत. पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने पाहून बाजारातील चोरांना आवरावे अशी मागणी होत आहे.

 

जनावरांना घेऊन येणाऱ्या गाड्यांची बिनधास्त वसुली

नेकनूर च्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे जनावरे विक्री साठी घेऊन येणाऱ्या गाड्यांना मांजरसुबा महामार्ग पोलीस आणि नेकनूर वाहतूक पोलीस त्यांच्या गाड्या अडवून बिनधास्त वसुली करत असल्याने बेजरा झालेल्या वाहन धारकांनी एकत्र गोळा होऊन आम्ही बाजाराला यावे की नाही , पाचसहाशे रुपये भाड्यात दर रविवारी पोलिसांनाच अर्धे पैसे द्यावे लागत असल्याचे म्हणत संताप व्यक्त करत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा