जुन्या भांडणाची कुरापत काढुन मध्यरात्री दोघांवर तलवारीने सपासप वार करत जिवघेणा हल्ला




जुन्या भांडणाची कुरापत काढुन मध्यरात्री दोघांवर तलवारीने सपासप वार करत जिवघेणा हल्ला. 
एक गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक
गेवराई । ( ज्ञानेश्वर हवाले)
 तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून शनिवार दि. २६ मध्यरात्री १ च्या सुमारास झोपेत असताना तलवारीने सपासप वार केले.
सविस्तर माहिती अशी की  शेख समीर शेख अमीन हा आपल्या शेतात झोपलेला असताना रात्री एकच्या सुमारास शेख रईस शेख इसुफ ,शेख अनिस, शेख इनुस इसुफ हे तिघे आले व त्यांनी समीर यांच्यावर झोपेत असताना तलवारीने मानेवर, पायावर, पोटावर, हातावर सपासप वार करून फरार झाले आहेत .
या घटनेमध्ये समीर च्या सोबत असलेल्या शेख जावेद शेख वाहेद या मुलावर सुध्दा गुडग्यावर वार झाले आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री सिरसदेवी येथील बेंडकी या  शिवारात घडली असून शेजारी राहत असलेल्या लोकांनी आरडाओरडा ऐकल्यानंतर समीर यांच्याकडे धावत जाऊन समीर हा जखमी अवस्थेत असल्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी शेख समीर याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. रविवार दि. २७ सा. ५ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत होते ही माहीती नातेवाईक यांनी दिली.
 या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की जवाब घेण्यासाठी काही अधिकारी औरंगाबाद येथे गेले आहेत मात्र सध्यातरी सबंधीत पिडीताने जवाब दिला नसून ते जवाब देण्याच्या मनस्थिती नसल्याचे सांगितले आहे.
या घटनेमुळे सिरसदेवी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 पिडीत जवाब देत नाही त्या व्यक्तीवर कोणी दबाव तर आणत नसेल ना?
सिरसदेवी येथे चुलत भावाने शेतातील घरात झोपलेल्या चुलत भावावर मध्यरात्री १ च्या दरम्यान तलवारीने घाव घालत जिवघेणा हल्ला केला यात गंभीर जखमी शेख समिर बेशुद्ध अवस्थेत होता. शुध्दीवर आल्या नंतर तलवाडा पोलिस यांनी जवाब विचाराला असता त्याने जवाब दिला नाही. पुन्हा हल्ला होण्याची भिती आहे कि कोणी जवाब देऊ नये म्हणून पिडीतावर दबाव तर आणत नसेल ना?
 गेवराई तालुक्यात गुन्हेगारी वाढली.
तालुक्यात गुन्हेगारी वाढली असून चंदन तस्करी, वाळु चोरी, धाडशी चोऱ्या, दुचाकी चारचाकी वाहनांच्या चोऱ्यासह चाकू, तलवारीने जिवघेणे हल्ले होऊ लागले आहेत. पोलिसांची गुन्हेगारांवरील वचक पुर्वीसारखी राहिलेली नाही अशी तालुक्यातील नागरीक चर्चा करत आहेत. 
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा