तलवडा येथिल अर्जुन हत्ते यांचे दुःखद निधन
अर्जुन हत्ते यांचे निधन
ऍड सुरेश हत्ते यांना बंधूशोक

तलवडा दि.01 (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील तलवडा येथील रहिवाशी अर्जुन सखाराम हत्ते यांचे महाशिवरात्री दिवशी दि 01 मार्च रोजी ( वर्षे 70 ) यांचे अचानक छातीत दुखू लागल्याने निधन झाले.
तळवडा येथील ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात 12 वाड्याचे सरपंच यांचे पूत्र व आधुनिक शेतकरी म्हणून लवडा सर्कल मध्ये परिचीत होते. त्यांना सांप्रदायिक क्षेत्राची व सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. मंगळवार दि.१ रोजी सकाळी 9 वा त्यांची प्राणजोत मालवली. त्यानंच्या पश्‍चात पत्नी,
दोन मुले, सून, नातवंडे, मुली, जावई असा परिवार आहे.
सांप्रदायिक. सामाजिक, राजकीय , कार्यात नेहमी त्यांचा पुढाकार आल्याने ते तलवडा परिसरात परिचित होते .

रविवारी दुपारी 3 वा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ऍड सुरेश हत्ते यांचे चुलत बंधू व ऍड नारायणराव लोणकर यांचे मेहुणे होते.
या वेळी सांप्रदायिक,सामाजीक,राजकीय,पत्रकार, वकील, डॉक्टर,शेतकरी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सावडण्याचा कार्यक्रम मंगळवारी दि.02 रोजी सकाळी ठीक ०८ वा तळवडा येथे होईल.
हत्ते यांच्या कुटुंबियावर कोसळलेल्या दु:खात दैनिक मराठवाडा पत्र परिवार सहभागी आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा