कठोर परिश्रम केल्यास निश्‍चितच यश मिळते – मिना तुपे




कठोर परिश्रम केल्यास निश्‍चितच यश मिळते – मिना तुपे
नवगण राजुरी ।
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेचा पर्याय निवडल्यास उज्वल भवितव्य मिळणार, योग्य ध्येय ठरवून सातत्याने कठोर परिश्रम केल्यास निश्‍चितच यश मिळते असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक मिना तुपे यांनी केले.
नवगण राजुरी येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य केशव भांगे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून श्रीमती मिना तुपे, प्रा.श्रीकांत मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मिना तुपे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी वास्तव परिस्थितीचे भान ठेवावे, कठोर परिश्रमाशिवाय यश मिळणार नाही. योग्य ध्येय ठरवून सातत्याने कठोर परिश्रम केल्यास निश्‍चितच यश मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या निवडीच्या क्षेत्रात करीअर केले पाहिजे असे सांगून वास्तव परिस्थिती कशी असते ती कशी जीवनात आत्मसात करावी लागते हे विद्यार्थ्यांना उदाहरणासह पटवून सांगितले.
प्राचार्य केशव भांगे यावेळी बोलताना म्हणाले स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अपयश हीच यशाची पहिली पायरी असते त्यामुळे अपयश आले तरी खचून न जाता खडतर परिश्रम करून जीवनात यशस्वी झाले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
याशिवाय श्रीकांत मुळे, उपमुख्याध्यापक शिंदे एस.एस. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक शिंदे आर.आर., शेख एस.वाय., शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा