जिल्हा कर अधिकारी अनिल कुमार शेळके यांनी तब्बल 92 दिवसांची नर्मदा परिक्रमा पूर्ण




नर्मदा हर एक परिक्रमा
गावकऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत।
बीड । तालुक्यातील वांगी चे जिल्हा कर अधिकारी अनिल कुमार शेळके यांनी तब्बल 92 दिवसांची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आज वांगी या गावी अभूतपूर्व जल्लोषात संत महंतांच्या उपस्थितीमध्ये आगमन झाले पंचक्रोशीतील. काठोडा,राजुरी,इमामपूर,भवानवाडी,शिवणी,मुंढेवस्ती,बीड या ठिकाणाहून अध्यात्मिक,धार्मिक व वारकरी क्षेत्रातील कीर्तनकार,प्रवचनकार, तरुण, विद्यार्थी वेगवेगळ्या सेवा क्षेत्रातील कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने साहेबांच्या स्वागतासाठी टाळ मृदंग घेऊन उपस्थित होते. नारायणी हॉस्पिटल चे डॉक्टर प्रदीप यांनी त्यांच्या मिरवणुकीसाठी खास ओपन गाडीच नियोजन केलं होत.या अध्यात्मिक गुरु साठी ग्रामस्थ,मित्रपरिवार,स्नेही, पंचक्रोशीतील भाविक, महिला, विद्यार्थी यांनी काठोडा ते वांगी अध्यात्मिक गुरु अनिल शेळके साहेब यांची मिरवणूक अखंड नंदगिरी लाटे महाराज, ह-भ-प रामेश्वर महाराज,ह भ प अरुण नाना डाके, ह भ प रोहिदास महाराज शेळके, ह भ प मोहन महाराज शेळके,ह भ प माऊली दादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काढण्यात आली. संपूर्ण गावामध्ये साहेबांची मिरवणूक काढून स्वामी निर्मळनाथ मंदिर या ठिकाणी मार्गदर्शन केले.अध्यात्मिक गुरु शेळके साहेब यांचा ग्रामस्थ,मित्रपरिवार,संत महंतां तर्फे खूप मोठा सत्कार करण्यात आला.धार्मिक गुरु अनिल शेळके साहेबांचा आजचा हा भक्तिमय सोहळा आनंदाश्रूने डोळे दिपवणारा, मन प्रारब्ध करणारा, स्वतःच्या पुढील आयुष्याला दिशा देणारा ऐतिहासिक ठरला कारण गावकऱ्यांना तब्बल 92 दिवसांची आपल्या लेकराची लागलेली ओढ आज पूर्ण झाली होती. गावातील संपूर्ण महिलांनी रांगोळी,सडा,टाकून ओवाळणी केली गावातील विद्यार्थी,पुरुष,महिला फेरीमध्ये तल्लीन झाले होते. प्रचंड भक्तिसागर ओसांडल्याचे जाणवत होते.अध्यात्मिक गुरु शेळके साहेब यांनी सर्वांना त्यांच्या नर्मदा परिक्रमेतील आलेले अनुभव कथन करून स्वतःच्या ध्येयप्राप्तीसाठी अहंकार,सेवा,त्याग, जिद्द,श्रद्धा आणि आई-वडिलांचे संस्कार या मूल्यांचा अवलंब केल्यास यस चालून येते हे सिद्ध करून दाखवले. सर्वांनी आपोपल्या क्षेत्रात किर्तीवंत,यशवंत होण्याचा सल्ला ही दिला. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व संत-महंतांच स्वागत सरपंच रामाहारी हाडुळे, उपसरपंच दिलीपराव बजगुडे यांनी केले.
शेवटी या कार्यक्रमाचे आभार ह.भ.प. अरुणा नाना डाके यांनी केले तर सुंदर असं सूत्रसंचालन ह भ प रोहिदास महाराज शेळके यांनी केल्याचे हरिभाऊ शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा