माजी सरपंच शिवाजी राजगुरे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या




माजी सरपंच शिवाजी राजगुरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्या कॅबिनमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या ।

बीड । ईट येथील माजी सरपंच शिवाजी राजगुरे यांनी रविवार दि.०६ मार्च रोजी रात्री 3 च्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्या कॅबिनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र  फाशीचे कारण अद्याप कळू शकले नाही. बीड येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई -वडील ,भाऊ ,बहीण. असा परिवार आहे.
सोमवा दि.०७ रोजी ईट येथे दुपारी २ वा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण नाना डाके, उपसभापती गणपत अप्पा डोईफोडे, सचिव अशोक वाघिरे, सरपंच गोरख डोईफोडे दैनिक मराठवाडा पत्र चे संपादक दत्तात्रय नरनाळे यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक नागरिका या वेळी उपस्थित होते.
त्यांच्या मनमिळावू स्वभावाने नातेवाईक व मित्र परिवारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या दुःखात दै. मराठवाडा पत्र परिवार सहभागी आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा