गुरुनानक प्राथमिक विद्यालयात महिलादिन उत्साहात साजरा
गुरुनानक प्राथमिक विद्यालयात महिलादिन उत्साहात साजरा

बीड । श्री विठ्ठलगड शि.प्र.मंडळ सारणी ता.केज संचलित गुरुनानक प्राथमिक विद्यालय,शाहूनगर,बीड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती पवार एस.ए. या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती कमलताई निंबाळकर या होत्या तसेच प्रमुख मार्गदर्शक सहशिक्षिका श्रीमती डोंगरे यु.एम.या होत्या.कायक्रमाचे खास आकर्षण म्हणजे विविध वेशभूषेत सजून आलेल्या विद्यार्थिनी तसेच माता पालकांचा कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग.
शाळेतील विद्यार्थिनी कु.जोगदंड प्रतीक्षा,साळुंके आरुषी, जाधव समृद्धी,कवले किरण यांनी मनोगत व्यक्त केले तर कु.वाघमारे मिहिका हिने सुंदर असे महिलांविषयी गीत गायन केले.
कार्यक्रमाच्या अतिथी निंबाळकर मॅडम यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरुनानक प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षिका आणि त्यांना सहकार्य करणारे शिक्षक यांचा शाल व सुंदर पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला पुढे महिलांच्या सन्मानार्थ बोलताना म्हणाल्या की स्त्रियांनी आता सक्षम बनायला हवं आपल्या मुलांना प्रशासकीय सेवेत उच्च पदावर पोचवण्यासाठी प्रेरित करायला हवं. निंबाळकर ताईंना *जिजाऊ रत्न* पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचा महिलादिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक श्रीमती डोंगरे यु.एम.यांनी उपस्थित स्त्रियांना मार्गदर्शन करताना सांगितले की आमचा लाटणं ते लॅपटॉप पर्यंत चा प्रवास अतिशय संघर्षमय होता पण तरीही त्यातून मार्ग काढत स्त्रियांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मुलींनी स्वतःकर्तृत्व पणाला लावून एक बेंचमार्क निर्माण करावा.
कार्यक्रमात उपस्थित महिला पालकांचा गुलाबपुष्प देऊन महिलादिनी सन्मान करण्यात आला याबद्दल महिलांनी आनंद व्यक्त केला. इयत्ता दुसरी ची विद्यार्थिनी दुधाळे प्राजक्ता हिचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला तर कु. गिऱ्हे अनुष्का ने गुलाबपुष्प देऊन आपल्या शिक्षकांचा सन्मान केला. अशा तऱ्हेने अतिशय हर्षोल्हास्त महिला दिनाचा कार्यक्रम शाळेत पार पडला.या कार्यक्रमचे बहारदार सुत्रसंचलन श्रीमती मुंडे एस.व्ही.यांनी केले तर उपस्थितांचे मनस्वी आभार श्री ठोकरे सर यांनी मानले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री तांदळे सर यांनी केले तर श्री तेलप सर,हांगे मॅडम आणि पव्हणे मॅडम तसेच सेवक नासेर खान पठाण यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.अशा रीतीने महिलादिनाचा सुंदर सोहळा माता पालकांना देखील यानिमित्ताने अनुभवता आला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा