दोन वर्षानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती गुलाबाचे फुल




ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारा अजिनाथ गवळी यांचा उपक्रम
………
शिरूर कासार ।
कोरोनाच्या प्रकोपामुळे मागील दोन वर्षापासून शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कालावधीत झाल्याच नाही परंतु दोन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी संपल्यानंतर या वर्षी दहावी व बारावीच्या ऑफलाईन परीक्षा प्रशासनाकडून घेतल्या जात आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ न प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे ऑनलाईन शिक्षण घेऊन दोन वर्षानंतर विद्यार्थी थेट ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवलेला उपक्रम परीक्षार्थींना प्रेरणादायी ठरणार आहे.

इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाची परीक्षा प्रथमच महत्त्वपूर्ण असते परंतु मागील दोन वर्षापासून धोरणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे ऑनलाइन शिक्षण प्रणाली प्रभावी नसल्याने याचादेखील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलेला आहे स्वयम् पद्धतीने अभ्यास करून विद्यार्थी दोन वर्षानंतर या वर्षी परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलेले आहे दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिरूर कासार तालुक्यातील गोमळवाडा येथील परीक्षा केंद्रावर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांच्या हाती गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी स्वागत केले आहे हा उपक्रम परीक्षार्थींच्या चेहऱ्यावर आनंद पुरवणारा होता यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या भयापासून दूर गेलेले ची स्थिती यावेळी परीक्षा केंद्रावर पाहण्यासाठी मिळाली.
जिल्हापरिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी श्री.नागनाथ शिंदेसाहेब व शिरुरचे गट शिक्षणाधिकारी श्री.जमीर शेखसर यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली गोमळवाडा परिक्षा केंद्रावर परिक्षा सुरळीत सुरू झाल्या आहेत.केंद्रावर बैठे पथकामधे श्री.आजीनाथ गवळीसर,परिक्षाकेंद्र उप संचालक,श्री.आण्णासाहेब ढाकणेसर,पर्यवेक्षक श्री.एन.एस.जरांगेसर, श्री.टि.ए.येवलेसर,श्री.डि.बी.पाटीलसर,लिपीक श्री.भागवत गर्जेसर,शिपाई श्री.विजय साळवे,सुनिल सानप आदी उपस्थिती आहे
…………
Covid-19 नंतर प्रथमच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च -2022 घेण्यात येत आहेत.विद्यार्थी निर्भय,शांत व आनंदाने परीक्षेस सामोरे जावेत.याकरिता बऱ्याच ठिकाणी परीक्षार्थीचे गुलाबपुष्पे देऊन स्वागत करून,आनंद द्विगुणीत केला आहे. असे सांगुन बीड जिल्हापरिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी सर्व परिक्षाकेंद्रावरील कर्मचारी
,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
———

-नागनाथ शिंदे शिक्षणाधिकारी माध्य.जि.प.बीड
—————————————-
दहावी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी मी मागील दोन वर्षापासून अथक परिश्रमाने अभ्यास करत आहे मी माझ्या आयुष्यातील पहिलेच बोर्डाची परीक्षा देत असल्याने माझ्या मनावर काय होईल कसे होईल याचा मोठा तणाव निर्माण झालेला होता परंतु परीक्षा केंद्रावर आमच्या झालेल्या स्वागता मुळे हा तणाव काहीशा प्रमाणावर कमी झाला असून पहिला पेपर अत्यंत सहज दिला मला या उपक्रमामुळे तनाव मुक्त होण्याची संधी प्राप्त झाली.

(कु.आरती कातखडे – परीक्षार्थी गोमळवाडा)

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा