छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करूनच जिल्हा परिषदेच्या इमारतीचे होणार लोकार्पण – जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिवकन्याताई सिरसाट, उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे
 

 छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह स्व. गोपीनाथराव मुंडे व स्व. सुंदरराव सोळंके यांच्याही पुतळ्यांचे होणार भूमिपूजन

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी होणार लोकार्पण

बीड।  येथील जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात पूर्वी घेतलेल्या ठरावाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे तसेच ठरल्याप्रमाणे इतर सर्वच पुतळ्यांच्या कामांचे भूमिपूजन करूनच जिल्हा परिषद इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. 19 मार्च रोजी दुपारी एक वाजता संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट व उपाध्यक्ष श्री. बजरंग बप्पा सोनवणे यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्याचबरोबर छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती पुतळे तसेच लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे व स्व. सुंदरराव सोळंके यांचे पुतळे उभारण्याची घोषणा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत ठराव संमत केला होता, त्यानुसार शनिवारी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या ऑनलाईन उपस्थितीत तसेच पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांसह मान्यवरांच्या हस्ते या पुतळ्याचे भूमिपूजन व इमारतीचे लोकार्पण संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, खा. रजनीताई पाटील, खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, आ. सुरेश धस, आ. संजयभाऊ दौंड, आ. विनायक मेटे, आ. प्रकाश दादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता ताई मुंदडा, आ. लक्ष्मण पवार, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, मा. आ. सुनील धांडे, मा. आ. सय्यद सलीम, जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयसिंह सोळंके, कृषी सभापती सौ. सविताताई मस्के, महिला व बालकल्याण सभापती सौ. यशोदाताई जाधव, समाज कल्याण सभापती कल्याण आबुज, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, अनिलदादा जगताप, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांसह आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा