रस्त्यासह सिंचनांच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही – विजयसिंह पंडित
११ कोटी रु. किंमतीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा भव्य शुभारंभ

गेवराई l

दि. ३० अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या गेवराई तालुक्यातील सर्व बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजुर करून घेतला. रस्त्याच्या कामासह सिंचनांच्या कामांनाही निधी कमी पडू देणार नाही. सिंदफणा नदीवर लवकरच बॅरेज उभारून तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढवणार असून तालुक्यातील रस्त्याच्या डांबरीकरणाचा अनुशेष लवकरात लवकर भरून काढला जाईल असे प्रतिपादन जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. गेवराई तालुक्यातील मौजे पाचेगाव येथे ११ कोटी रुपये किंमतीच्या आणि १६.५० किमी लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

पाचेगाव चौक येथे विजयसिंह पंडित यांच्या हस्ते सुमारे ११ कोटी रुपये किंमतीच्या निपाणी जवळका-पाचेगाव-तळवट बोरगाव-धानोरा-जळगाव मंजरा या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी जि.प.सभापती बाबुराव जाधव, पं.स.चे माजी सभापती अप्पासाहेब गव्हाणे, माजी जि.प.सदस्य बाबुराव काकडे, संचालक विश्‍वांभर काकडे, सरपंच इम्तियाज पटेल, सरपंच संजय राठोड, इमु पटेल, माजी सरपंच मोतीराम गाडे, बिपीन डरफे, भगवान मते, मुजीब पठाण, सरपंच योगेश गव्हाणे, बाबुराव गाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या आणि सिंचनाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला जात आहे. तालुक्यातील विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. जयभवानी सह.साखर कारखान्याची कार्यक्षमता वाढवून तालुक्यातील सर्वच्या सर्व ऊस उचलला जाईल असे सांगून ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी विकास कामे दर्जेदार होण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. सर्वांनी एकदिलाने पक्ष संघटन वाढवून येणार्या काळात गेवराई विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान यावेळी विकास कामांना निधी मंजुर करून आणल्याबद्दल या भागातील ज्येष्ठ नागरीकांनी विजयसिंह पंडित यांचा भव्य सत्कार केला. यावेळी बाबुराव गाडे, मुजीब पठाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात आत्माराम प्रधान अभिमान धुताडमल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. विजयसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक हातोटे यांनी केले, सुत्रसंचलन सुधीर गाडे यांनी केले तर आभार अशोक मते यांनी मानले.

कार्यक्रमाला बाबुराव शिंदे, यायाह पटेल, अमोल डरफे, रवि शिर्के, बाबुराव हातोटे, रामराव राठोड, अशोक ढाकणे, माणिक मते, प्रल्हाद राठोड, चिंतामण लाखे, अभिमान डरफे, सत्यम खरसाडे, श्रीकृष्ण वेताळ, ओम खरसाडे, मुन्ना हातोटे, राहुल गाडे, अमोल राठोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा