बेलगावचे ग्रा.पं सदस्य श्री.शंकर जाधव,यांच्यासह अनेकांचा शिवसंग्राम मध्ये प्रवेश




 बबनराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश
 बीड
  आ.विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बेलगावचे ग्रामपंचायत सदस्य श्री.शंकर जाधव, युवा नेते विठ्ठल शेळके ,नितीन शेळके, रोहिदास शेळके , विकास शेळके आदिंचा ऊसतोड कामगार नेते बबनरावजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश केला
बीड पंचायत समितीचे लिंबागणेश सर्कलचे पंचायत समिती सदस्य तथा शिवसंग्रामचे ऊसतोड कामगार नेते बबनराव  माने  यांचा वाढता जनसंपर्क व प्रत्येक गावातील घराघरांमध्ये ऊसतोड कामगार या नात्याने ओळख निर्माण करणारे संकटकाळी मदतीला धावून  जाणारे तसेच मुलीबाळीच्या लग्नामध्ये पुढाकार घेणारे  एक आपला माणूस अशी ज्यांची या सर्कलमध्ये ओळख आहे . बबनराव माने  हे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या माध्यमातून समाजकारणात व राजकारणात सक्रिय आहेत पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आता नुकतेच बिगुल वाजणार आहे यासाठी शिवसंग्रामने ही चांगली कंबर कसली आहे संपूर्ण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तसेच बीड नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवायची असे आ. विनायकराव मेटे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले व कामाला लागा हा संदेश दिला होता याचाच एक भाग म्हणून आज बेलगावचे ग्रामपंचायतचे सदस्य यांचा आ.विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश झाला खऱ्या अर्थाने एक – एक मावळा लाख मोलाचा असतो म्हणून राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती ही एक मोलाची कामगिरी बजावणारी असते म्हणून आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम
सातत्याने चालू आहे येणारा काळामध्ये  शिवसंग्रामचे पारडे हे जड होत आहे.याप्रसंगी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे  शिवसंग्रामचे नेते नारायण काशीद ,ओबीसी नेते बंडू शहाणे ,सचिन आमटे,हिरामन शिंदे,धर्मराज मसवले, तसेच किसन महाराज शेळके व नवनाथ महाराज शेळके कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा