भारतीय संविधान भारतीय लोकशाहीचा आत्मा – डॉ. अरुण राख
भारतीय संविधान भारतीय लोकशाहीचा आत्मा – डॉ. अरुण राख

पाथर्डी ।


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयत भारतीय संविधान या विषयावर प्रोफेसर डॉ. अरुण राख, राज्यशास्त्रा विभाग प्रमुख, बाबूजी आव्हाड महाविद्याल यांचे व्याख्यान आयोजत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. जे. टेमकर यांनी केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान बनविताना समाजातील प्रत्येक घटकांची उन्नती कशी होईल या विषयी विशेष काळजी घेतली आहे. विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ बांधण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे असे प्रतिपादन केले. भारतीय संविधान या विषयावर बोलताना डॉ. अरुण राख यांनी भारतीय संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे असे सांगितले. भारतीय संविधानची वैशिष्ट्ये, मूलभूत हक्क याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आय. क्यू. ए. सी. प्रमुख प्रा. राजू घोलप यांनी संविधान निर्मितीचे ऐतिहासिक आढावा घेताना, अश्मयुगापासून राजेशाही, लोकशाहीचा विकास कसा होत गेला या विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अनुराधा काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आसाराम देसाई, प्रा. अस्लम शेख डॉ. नितिन भिसे, प्रा. योगिता इंगळे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी डॉ. राजकुमार घुले, डॉ. विलास बनसोडे, डॉ. दळवी, प्रा. अमोल आगाशे व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार डॉ. साधना म्हस्के यांनी मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा