धारूर महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन व्याख्यान व ग्रंथ प्रदर्शनाने संपन्न




धारूर l
 येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज दिनांक 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालय व माहिती केंद्र, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किल्लेधारुर व राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. एस. बी. मस्के यांनी पुस्तकांच्या वाचनातून बौद्धिक विकासासोबत माहितीप्रधान समाजाची निर्मिती होते असे विचार मांडले. यासाठी प्रत्येक नागरिकांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने जागतिक पुस्तक दिन साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. सदरील कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ दीपक भारती यांनी अध्यक्षीय समारोपात प्रत्येकाने वाचनाची सवय स्वतःपासूनच सुरू करावी तेव्हाच वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन होईल असे मत मांडले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक ग्रंथपाल गोपाळ सागर व सहसमन्वयक डॉ. नितीन कुंभार यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित उपप्राचार्य डॉ. मिलिंद गायकवाड, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, डॉ. गोपाळ काकडे, डॉ. दिगंबर गंजेवार, पर्यवेक्षक सिद्धेश्वर काळे, कार्यालयीन अधीक्षक धनंजय सोळंके यांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच जागतिक पुस्तक दिन सोहळा हा महाविद्यालयीन ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन आयोजित करून संपन्न करण्यात आला. सदरील ग्रंथप्रदर्शन सोहळ्यात महाविद्यालयातील सर्व वाचकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा