सांडस चिंचोली से.स.सो.आ.प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात




सांडस चिंचोली से.स.सो.आ.प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात
चेअरमनपदी आशोक कदम तर व्हा.चेअरमन पदी सुधाकर मोरे यांची निवड
माजलगाव ।
तालुक्यातील सांडस चिंचोल,नागडगाव सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होऊन आ.प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात आली होती,दि २९ एप्रिल शुक्रवार रोजी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आशोक नरहरी कदम तर व्हाईस चेअरमनपदी नागडगाव येथील सुधाकर गंगाधर मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली,नागडगाव सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक पार पडली,हि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नागडगावचे सरपंच विनायकराव कदम,सांडस चिंचोलीचे सरपंच आशोकराव कदम,से.स.सो.चे.माजी चेअरमन श्रीकृष्ण शेजुळ,बालासाहेब भोसले,आमोल चंदनशिव,माऊली कदम,ईंजी भोसले,बालासाहेब उफाडे,सतिष होळकर,बालासाहेब कदम,भुंजग तुंभारे,आंकुश कुंडकर व मंजुळादास वाघे यांनी परिश्रम घेऊन सांडस चिंचोली,नागडगाव सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती,नवनिर्वाचित संचालक मंडळाची चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडण्या संबधीची बैठक दि २९ एप्रिल शुक्रवार रोजी ठेवण्यात आली होती, यामध्ये चेअरमनपदी आशोक नरहरी कदम यांची तर व्हाईस चेअरमनपदी नागाडगाव येथील सुधाकर गंगाधर मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन आशोक कदम,व्हाईस चेअरमन सुधाकर मोरे व संचालक मंडळाचा सत्कार नागडगावचे सरपंच विनायकराव कदम यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा