जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नवीन रुग्णवाहीका
  • जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नवीन रुग्णवाहीका
    ———-
    गेवराई
    तालुक्यात विस्ताराने मोठे असलेल्या जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी प्रशासनाच्या आरोग्य विभागाने नविन रुग्णवाहीका दिल्याने शनिवारी रुग्णवाहीकीचे आरोग्य केंद्रातील अधिकारी व चर्मचारी यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
    गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे जिल्हा परिषदेचे छप्पन गावे संलग्न असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्रामुख्याने तालुक्यात हे आरोग्य केंद्र विस्ताराने मोठे असून या केंद्रात दोन मुख्य डाॅक्टर सह तीस कर्मचारी नागरिकास आरोग्य सुविधा देण्यासाठी दिमतीला आहेत. मागील काही वर्षापूर्वी देण्यात आलेली रुग्णवाहीका गेल्या बंद असल्यामुळे कुटुंब शस्त्रक्रिया आणि बाळंत महिला यासाठी बाहेरुन खासगी वा.न करुन गाव जवळ करावे लागत होते.मात्र, जातेगाव येथील रहीवाशी तथा बीड जिल्हा रुग्णालयात टिबी विभागातील कर्मचारी किशोर चव्हाण यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दि १८ जुलै २०२१ रोजी लेखी निवेदन देऊन नविन रुग्ण वाहीकेची मागणी केली होती. अखेर त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शनिवार दि ३० रोजी जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नविन रुग्णवाहीका देण्यात आली. असता या रुग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी चंद्रज्योती कदम,आरोग्य सेवक वसंत पवार, आरोग्य सेविका प्रियंका सुरडकर,व्दारका चाटे,बीड जिल्हा रुग्णालयातील टीबी (क्षयरोग)विभागातील कर्मचारी किशोर चव्हाण, कल्याण चव्हाण, दत्ता वाघमारे,राधेश्याम धोंडरे अदीची उपस्थिती होती.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा