बीड मध्ये हॉटेल, रेस्टॉरंट व केटरिंग यांचे फॉसटॅग (FoSTaC) अन्न सुरक्षा प्रशिक्षण संपन्न
बीड जिल्हा व्यापारी महासंघ (कॅट),पवनकुमार धुत, मिठाई फरसाण व हॉटेल संघटना यांनी केले उत्कृष्ट नियोजन
———-
बीड ।

अन्न व औषध प्रशासन बीड यांच्या सहभागाने व अन्न सुरक्षा प्रशिक्षक प्रियंका सूर्यवंशी व कॅट या व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी तसेच बीड शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत सोमवार दिनांक 23 मे रोजी शहरातील माँ वैष्णव पॅलेस येथे बीड शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व मिठाई दुकान या अन्न व्यवसायकांचे अन्न सुरक्षा व प्रशिक्षण (फॉसटॅग फूड सेफ्टी ट्रेनिंग) या एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,अशी माहिती अन्न प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन बीड जिल्हा व्यापारी महासंघ (कॅट), पवनकुमार धूत (अन्न सुरक्षा मित्र),स्वीट मार्ट संघटना, हॉटेल संघटना यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी हॉटेल, रेस्टॉरंट,केटरिंग व मिठाई दुकान येथे अन्न पदार्थ बनवणाऱ्या व हाताळणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण व माहिती देण्यात आली.
केंद्र शासनाने 15 एप्रिल 2018 रोजी खाद्य पदार्थ बनवणाऱ्या व विकणाऱ्या सर्व अन्न व्यापाऱ्यांना अन्न सुरक्षिततेसाठी व स्वच्छतेसाठी अन्नसुरक्षा प्रशिक्षण (फॉसटॅग फूड सेफ्टी ट्रेनिंग) हा कार्यक्रम आमलात आणला आहे. अन्नसुरक्षा कायदा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन नुसार आस्थापनेमध्ये बनवण्यात येणारे, विकले जाणारे अन्न पदार्थ व त्यांच्या स्वच्छतेविषयी तसेच हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये काम करणारे,अन्न बनवणारे कामगार यांना त्यांच्या कामाविषयी व आरोग्य बद्दल तसेच खाद्यपदार्थ हाताळणी कशी करायची, अन्न हाताळते वेळी कोणती विशेष काळजी व्यक्तीने घ्यावी, याचे प्रशिक्षण सोमवारी झालेल्या प्रशिक्षणा दरम्यान देण्यात आले. या प्रशिक्षणात अन्न आस्थापना अन्न परवाना अटी व शर्ती याबाबत इत्यंभूत माहिती देण्यात आली व त्यानुसार व्यवसायात घ्यावयाची काळजी याबाबत श्री. सय्यद इम्रान हाश्मी,सहाय्यक आयुक्त बीड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाद्वारे अन्न व्यवसाय करणाऱ्या मध्ये अन्नसुरक्षा व स्वच्छते विषयी जागरुकता वाढेल म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असे प्रशिक्षण सर्व अन्न व्यापाऱ्यांनी घ्यावे, असे मत सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी व्यक्त केले.
प्रशिक्षणानंतर उपस्थित व्यापारी यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरील प्रशिक्षणामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व स्वीट मार्ट व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा