पिंपळनेर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी




 

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये अखंड हिंदुस्तानात हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे व आंब्याच्या झाडाचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा.सुरेश सावंत, पत्रकार बळीराम मेहत्रे, विशाल इतापे, सुनील चादर ,भारत ढेंगे, नामदेव बन, सखाराम बीटे, आकाश चादर आदी उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना येणाऱ्या काळात पिंपळनेर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी आम्ही सक्षम असून आपली माणसं मोठी झाली पाहिजेत या हेतूने काम करित असल्याचे सांगितले. यानंतर आंब्याचे झाड मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षिका सुरेखा यादव, ज्योती राऊत सह कर्मचारी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा