केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कार्यालयातच झाला जीवघेणा हल्ला.
केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कार्यालयातच झाला जीवघेणा हल्ला.

केज ।

केज येथील तहसील कार्यालयात महिला नायब तहसीलदारांवर एकाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जखमी असलेल्या नायब तहसीलदार यांना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोर हा सख्खा भाऊ असून, संपत्तीच्या वादातून हल्ला केल्याची चर्चा आहे.

आशा वाघ असे जखमी नायब तहसीलदार यांचे नाव आहे. त्या स्वतःच्या कार्यालयात असताना तेथे त्यांचा भाऊ आला. त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही समजण्याच्या आत जवळील धारदार कोयत्या सारख्या शस्त्राने हल्ला केला. यामध्ये आशा वाघ या गंभीर जखमी झाल्याने प्रथम उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल करण्यात आले. येथे प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तहसील कार्यालयात धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. चक्क नायब तहसीलदार असलेल्या महिलेवर कार्यालयात जिवघेणा हल्ला झाल्याने केज शहरात खळबळ उडाली आहे. घटना इतकी गंभीर होती की घटनार स्थळी रक्ताचे पाट वाहताना दिसून आले. घटना घडल्यात नंतर तहसील कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी तहसील कार्यालयात गर्दी केली होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा