काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचे शिवक्रांती संघटनेकडून स्वागत – गणेश बजगुडे पाटील
*काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचे शिवक्रांती संघटनेकडून स्वागत – गणेश बजगुडे पाटील*
बीड l  समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून जातीयवाद  पसरवणाऱ्या तथाकथित काँग्रेसी नेत्याचे आज काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी हकलपटी करून काँग्रेस पक्ष हा मराठा समाजाच्या विरोधात नसून मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचे पत्र आज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे. या त्यांच्या निर्णयाचे मराठा समाज व शिवक्रांती संघटनेच्या वतीने आम्ही स्वागत करतो आसे शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे यांनी पत्रकातून सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या नंतर बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील आरक्षण विरोधकांना फार आनंद उफाळून येत होता. खरंतर मराठा समाज हा नेहमी मोठ्यlभावाच्या भूमिकेत राहणारा सहिष्णु समाज आहे. _मराठा समाजाने आजपर्यंत सर्वच आरक्षणाला व समाजाला वेळोवेळी पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी राहून आपली संस्कृती व भूमिका जपलेली आहे._ परंतु दुर्दैवाने मराठा समाजाच्या आरक्षणावर बीड जिल्ह्यातील मुंडे नामक काँग्रेसच्या तथाकथित ओबीसी नेत्याला एवढा आनंद उफाळून का आला हे आम्हाला समजलेच नाही. ज्या मराठा समाजाने त्यांच्या अडचणीत त्यांची पाठराखण केली, त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्यावर त्यांचे सत्कार केले. दुर्दैवाने त्याच समाजाला आरक्षणाचा वाटा काय वाटी ही मिळू देणार नाही असे म्हणत आपल्या आकलेचे तारे फेसबुकच्या माध्यमातून तोडले, आम्हाला त्यांच्या बुध्दीची कीव येते या मराठ्यांच्या महाराष्ट्रात आमची वाटा घाटी करण्या यवढे आपण मोठे आहात का ?  याचे आत्मचिंतन आधी करा व यापुढे मराठाच काय कुठल्या ही समाजाबद्दल जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नका.  महाराष्ट्रातील मराठा समाजाने एकजुटीने या प्रकरणाचा आगदी संयमाने निषेध करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. आमच्या मागणीची दाखल घेत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी त्यांची हकालपट्टी केली. ज्या बीड मतदार संघात व महाराष्ट्रात प्रामुख्याने आसलेल्या मराठा समाजाबद्दल यावढं द्वेष असणारा नेता काँग्रेस काय कुठल्याच पक्ष्यात राहणे हे त्या पक्षाला धोक्याचे आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने घेतलेला निर्णय हा योग्यच असुन आम्ही शिवक्रांती संघटनेच्या वतीने या भूमिकेचे स्वागत करतो. व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून ही त्यांना पदमुक्त करावे अशी मागणी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे केलेली आहे. असे  शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी सांगितले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा