एसटी महामंडळाकडून 4700 विशेष गाड्या




एसटी महामंडळाकडून 4700 विशेष गाड्या

  1. मराठवाडा पत्र न्यूज।

वारीदरम्यान वारकरी आणि विठ्ठलभक्तांचा पंढरपूर प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी 4700 विशेष गाड्या चालवण्यात येतील, अशी घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली आहे.

यावेळी पंढरपूरमध्ये वारकरी आणि भाविक गर्दीच्या नियोजनासाठी चार तात्पुरते बसस्थानकही उभारण्यात येणार आहेत.

जादा एसटींची सुविधा 6 जुलै ते 14 जुलैदरम्यान असेल. वाखरी येथील रिंगण सोहळ्यासाठी 8 जुलै रोजी 200 जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

वारीसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग भाविकांना सुरक्षित सेवा देण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, असं परब म्हणाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा