बहिरवाडी सर्कलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची सामाजिक कार्येकर्ते- प्रा राजु उनवणे यांची मागणी
बीड । बीड शहरातील कुर्ला रोड भागामध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी शहरात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करा . यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय मदत देणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.
बीड शहराजवळील विश्वादत्त लॉन्स या ठिकाणी कोविड सेंटर चालू केल्यास कोरोनाबाधित अथवा कुठलीही लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांवर शहरातच उपचार करता येतील.बीड शहरातील करोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची क्षमता हळूहळू कमी होत चालल्याने रुग्णांची येत्या काळात गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार संबंधित त्यांच्या हद्दीतील सरकारी प्रकल्पाच्या इमारती, कॉलेज, शाळा आणि शैक्षणिक संस्था यांचा ताबा घेत त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर यांची सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे शहरातील वाढत्या रुग्णांसाठी आणि त्यांची शहरातच सोय करण्यासाठी कुरलारोड वर कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी राजू उनवणे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांच्या कडे केली. १०० खाटांचे कोविड सेंटर चालू केल्यास शहरातील बाधित मात्र करोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर येथे उपचार करता येतील.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा