अविनाश जाधव यांनी पांडुरंग नगरचा रस्ता केला स्वखर्चातून !




अविनाश जाधव यांनी पांडुरंग नगरचा रस्ता केला स्वखर्चातून !
नागरिकांना मिळाली चिखल बीडमधून मुक्ती ; अबाल वृद्धांनी दिले शुभ आशीर्वाद !!
बीड ।


शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या पांडुरंग नगर मधील रस्त्याची समस्या दिवसो दिवस बिकट बनत चालली होती रस्त्याच्या नावाखाली फक्त चिखल सर्वत्र पसरला होता, याचा त्रास महिला वृद्ध व लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होत होता प्रशासनाकडे परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी निवेदन दिली निगरगट्ट प्रशासनाने याकडे नेहमीच डोळझाक केली , शेवटी परिसरातील महिलांनी टायगर ग्रुप चे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे रस्त्या संदर्भात अडचणी मांडल्या रस्त्याची दुर्दशा सांगत असताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते .सामान्याच्या मदतीला नेहमी धावून जाणारे अविनाश जाधव यांनी तात्काळ याची दखल घेत पांडुरंग नगर भागातील रस्त्याची पाहणी केली लोकांची अडचण लक्षात घेत तात्काळ टायगर ग्रुप च्या माध्यमातून यंत्रणा कामाला लावत दोनच दिवसात रस्त्याचे काम पूर्णत्व केले, रस्त्याचे काम पूर्ण झाले याच्यावर परिसरातील नागरिकांना विश्वासच बसत नव्हता ,यापूर्वी अनेक राजकीय पुढारी ,प्रशासकीय अधिकाऱ्यांना रस्त्यासाठी निवेदन दिली मात्र परिणाम शून्य होता मात्र टायगर ग्रुप चे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे अडचण सगताच त्यांनी तात्काळ धाव घेत रस्ता करून घेतला.
देशात व राज्यात टायगर ग्रुप ऑफ महाराष्ट्र युवकांची मोठी संघटना आहे अडचणीत असलेले लोकंना तात्काळ मदत करणे सामाजिक कार्य करणे, अशी अनेक कामे टायगर ग्रुपच्या माध्यमातून केली जातात पैलवान तानाजी जाधव तथा मराठवाडा अध्यक्ष उमेश पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाध्यक्ष म्हणून अविनाश जाधव हे काम पाहत आहेत ,थोड्याच कालावधीमध्ये शहरात व जिल्ह्यात युवकांची मोठी फळी अविनाश जाधव यांनी उभा केली आहे आणि त्यांना मदतीचा हात देत चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम बीड जिल्हा टायगर ग्रुप च्या वतीने करण्यात येत असून एमआयडीसी भागातील पांडुरंग नगर येथे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याचा प्रश्न जटिल बनला होता नागरिकांना रस्ता नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता अनेक वेळा प्रशासनाकडे रस्त्यासाठी मागणी करण्यात आली राजकीय पुढाऱ्यांचे उंबरटे झीजवण्यात आले मात्र रस्त्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते, पावसाळ्यात रस्त्यावरून गुडघे एवढे चिखल होत असल्याने घरातून बाहेर निघणे जिकरीचे बनले होते , रात्री अप रात्री आजारी पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाणेही मुश्किल बनले होते शेवटी परिसरातील महिलांनी एकत्र येऊन टायगर ग्रुप चे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे रस्त्याची समस्या मांडली डिलिव्हरी साठी आलेल्या मुलींना इतर परिसरात किरायने घर करून द्यावे लागत असल्याची खंत येथील महिलांनी व्यक्त केली महिल, वृद्ध, लहान मुलांची समस्या लक्षात घेता तात्काळ स्वखर्चातून अविनाश जाधव यांनी पांडुरंग नगर येथील रस्ता केल्याने परिसरात एकच आनंद व्यक्त करण्यात आला तथा परिसराच्या वतीने अविनाश जाधव व टायगर ग्रुप च्या सदस्यांचा सत्कार सोहळा पांडुरंग नगर भागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात संपन्न केला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा