कौसडी येथे कोविड सेंटरची उभारणी महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण




बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीमध्ये जि. प. सदस्य बेबीनंदा  प्रभाकर वाघीकर पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून या ठिकाणी 50 घाटाचे कोविंड सेंटर उभारले. या सेंटरचा लोकार्पण सोहळा महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 11 मे रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. संजय उर्फ बंडू जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, सतीश मोगरकर, सुरेश नागरे, नानासाहेब राऊत, अविनाश काळे ,विशाल कदम, अतुल सरोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोराळकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तहसीलदार सखाराम मांडवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वायकोस यांनी केले तर प्रास्ताविक प्रभाकर दादा वाघीकर यांनी केले तर आभार पाटील यांनी मानले.

जिल्हा परिषद सदस्य  बेबीनंदा वाघीकर, नानासाहेब राऊत, अविनाश काळे, सभापती गंगाप्रसाद आनेराव, यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. ही मागणी येत्या आठवड्याभरात आपली मागणी पूर्ण करून परभणी जिल्ह्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार अशी ग्वाही त्यांनी या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांसमोर दिली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा