वीज खात्यातील इंजिनीअरच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची धाड




वीज खात्यातील इंजिनीअरच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकून कोटय़वधींची संपत्ती जप्त केली. त्याच्या नावावर चार अलिशान बंगले, एक डझन भूखंड तसेच अनेक महागडय़ा गाडय़ा असून त्याची संपत्ती उत्पन्नापेक्षा तब्बल 280 पटीने अधिक असल्याचा खुलासा झाला आहे.
दयाशंकर प्रजापती असे त्याचे नाव असून तो बालाघाट जिह्यातील वीज खात्यात असिस्टंट इंजिनीअर आहे. तसेच बैरागढमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागातील क्लार्कच्या घरातून 85 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. पोलीस दोघांची अधिक चौकशी करीत आहेत.

 

Datta Narnale

शेअर करा