घर फोडून दिड लाखाची रोखड लंपास
घर फोडून दिड लाखाची रोखड लंपास
बीड । प्रतिनिधी
बंद घर फोडून घरातील कपाटात ठेवलेले 1 लाख 60 हजार रुपये लंपास केल्याची घटना बीड शहरातील जय गुरुदेव रेसीडेन्सी फुलाईनगर, बीड येथे 15 ऑगस्ट रोजी रात्री घडली.
प्रकाश चंद्रकांत आनेराव यांनी बीड शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 15 ऑगस्ट रोजीच्या रात्री ते घरी नव्हते. त्यांव्हा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले रोख 1 लाख 60 हजार रुपये लंपास केले. 16 ऑगस्ट रोजी ते घरी आले असता आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बीड शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा