.चंदुलाल कलंत्री परिवाराचा अन्नदानाचा उपक्रम कोरोना संकटात प्रेरणादायी- राजेंद्र मस्के




डॉ.चंदुलाल कलंत्री परिवाराचा अन्नदानाचा उपक्रम कोरोना संकटात प्रेरणादायी- राजेंद्र मस्के

बीड l शहरात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे चिंता निर्माण झाली. शहराच्या प्रत्येक भागात कोरोनाने शिरकाव केला. अनेक कुटुंब पूर्णतः कोरोनाने बाधित झाली. कोरोनाच्या उद्रेकामुळे व्यक्तिगत व प्रशासकीय पातळीवर अनेक अडचणी व समस्यांना तोंड देण्याची वेळ जनतेवर आली. जे कुटुंब कोरोना बाधित झाले अशा कुटुंबांच्या अडचणी भयानक आहेत. भोजनाची व्यवस्था हि गंभीर समस्या अनेक कुटुंबांच्या पुढे उभी राहिली आहे. अशा कोरोना बाधित बीड शहरातील होम आयसोलेशन मधील कुटुंबाना घरपोहोच मोफत शुद्ध शाकाहारी व सात्विक भोजनसेवा डॉ.चंदुलाल कलंत्री परिवाराने ८ मे पासून सुरु केली आहे.

सामाजिक सद्भावनेतून सुरु केलेल्या अन्नदानाच्या उपक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भेट देऊन कलंत्री परिवाराचे कौतुक केले आहे. यावेळी यावेळी सीए गोपाल सेठ कासट भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहांगिर, जयप्रकाश कलंत्री, मनमोहन कलंत्री, डॉ.सुरेंद्र कलंत्री, अभिजित परिक्षित, सुनील कलंत्री, विनोद कलंत्री, अविनाश,अलोक,पृथ्विजीत कलंत्री परिवारातील सदस्य उपस्थित होते

डॉ.चंदुलाल कलंत्री परिवारातील सदस्य कोरोना बाधित झाल्यानंतर त्यांच्या पुढे भोजनाची समस्या निर्माण झाली. त्यावेळी भोजनासाठी झालेले हाल यातून त्यांना प्रेरणा मिळाली. कोरोनामुळे ज्यांच्यापुढे भोजनाची समस्या निर्माण झाली अशा कुटुंबांसाठी भोजन व्यवस्था करण्याचा संकल्प या परिवाराने केला व त्याप्रमाणे ८ मे पासून ते १९ मे पर्यंत हा उपक्रम ते राबवत आहेत. जे संपर्क करून मागणी करतात त्यांना भोजनसेवेचा लाभ मिळत आहे. दररोज १५० डब्बे पोहोच केले जातात. साधारण १५०० नागरिकांना याचा लाभ मिळाला. जेवणाची गुणवत्ता राखून सकस व शाकाहारी आहार दिला जात आहे.

प्रत्येक धर्मात अन्न पूर्णब्रह्म मानले जाते. सर्वात श्रेष्ठ दान म्हणून अन्नदानाची महती आहे. परंतु कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे उपचाराभावी अथवा उपासमारीने मानसं मरू नयेत यासाठी शासन आणि जनता दोघांनाही तारेवरची कसरत करून लोकांना आधार दिला जात आहे. अशा कठीण परिस्थितीत कलंत्री परिवाराने मोफत भोजनसेवेच्या माध्यमातून निर्माण केलेला दार्तुत्वाचा पायंडा निश्चितच लोकोपयोगी व कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या भयावह संकट काळात समाजातील सधन व संवेदनशील कुटुंबांनी पुढे येऊन अशा प्रकारचे लोकहिताचे सामाजिक उपक्रम राबवून गरजवंतांना मदतीचा आधार द्यावा असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

– ]कलंत्री परिवारातर्फे मोफत भोजनसेवा १९ मे पर्यंत चालू राहणार आहे. या कालावधीत कोरोना बाधित कुटुंबास (होम आयसोलेशन) भोजनाची आवश्यकता असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा ९४०४८४१२९८, ९४२१६५३०१६

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा