विहिरीत बुडणाऱ्या मुलाला वाचविताना दोघाही बाप लेकाचा मृत्यू
केज ।
तालुक्यातील एकुरका येथे विहिरीत बुडून बाप-लेकांचा दुर्दैवीमृत्यूझाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रोहन नटराज धस आणि नटराज रामहरी धस अशी मृतांची नावे आहेत.
तालुक्यातील एकुरका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेला सोनू उर्फ रोहन नटराज धस ( 13 ) आज शाळा सुटल्यानंतर वडील नटराज रामहरी धस (33 ) यांच्यासोबत शेतात गेला होता. रोहन शेतातील विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला असता पाय घसरून पाण्यात पडला. हे पाहताच नटराज यांनी विहिरीत उडी घेत रोहनला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र, रोहनने वडिलांचा गळ्याला मिठी मारल्याने ते दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशानुसार नांदूरघाट पोलीस चौकीचे मेसे आणि रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलविले आहे. बाप-लेकांच्या दुर्दैवीमृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा