चांगल्या दर्जाची विकास कामे होण्यासाठी माहितीचा अधिकार वापरा-अँड. अजित देशमुख




चांगल्या दर्जाची विकास कामे होण्यासाठी माहितीचा अधिकार वापरा-अँड. अजित देशमुख

आष्टी (प्रतिनिधी) ग्राम पातळीपासून ते तालुका स्तरापर्यंत सर्व कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत. निकृष्ट दर्जाची कामे जनतेला सातत्याने त्रासदायक ठरत आहेत. विद्यार्थी तसे पासूनच देश आपला आहे, हे लक्षात ठेवून माहिती अधिकाराचा जास्तीत जास्त वापर करा. ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे यांनी दिलेलं माहितीचा अधिकार हे शस्त्र व्यवस्था परिवर्तन करू शकते, असे मत ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले.

आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयामध्ये “माहिती अधिकारातून व्यवस्था परिवर्तन” या विषयावर प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करताना ते बोलत होते. चारशेच्या वर उपस्थिती असलेल्या या भरगच्च कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सोपानराव निंभोरे सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जन आंदोलनाचे तालुका अध्यक्ष रणजीत चव्हाण, तालुका सचिव प्रा. अजित इथापे हे होते.

यावेळी बोलताना अँड. देशमुख पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा सध्या मिळत आहेत. सुरुवातीला अशा सुविधा नव्हत्या. आता सर्व जग मोबाईल मध्ये दिसत आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या मुद्द्यावर माहिती घ्यावी. मोबाईल आपल्या हातात आहे. त्यामुळे कोणत्या माहितीचा वापर कसा करायचा आणि त्यात किती वेळ घालायचा, हे देखील विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे. माहिती अधिकारातून प्राप्त झालेली माहिती आणि नेटवरून प्राप्त होत असलेली माहिती, या सर्वांचा अभ्यास विद्यार्थ्यांना केला पाहिजे.

देशातील अनेक घोटाळे माहिती अधिकारातून बाहेर आले आहेत. अनेकांना जेलची हवा खावी लागली आहे. जिल्ह्यात काम करत असताना आपण शासनाचे तब्बल सात हजार कोटी रुपये कसे वाचवले, याची काही उदाहरणे देखील देशमुख यांनी यावेळी दिली.

विद्यार्थ्यांना आवाहन करताना देशमुख म्हणाले की, विद्यार्थी शिक्षण घेत असताना पासूनच देशाबद्दलची भक्ती, भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजली पाहिजे. त्यातूनच त्याच्याकडे सामाजिक दृष्टिकोन येतो. अशा दृष्टिकोनातून गोरगरिबांची सेवा करण्याची संधी उपलब्ध होत असते. आवश्यक तेथे न्याय देण्यात आपण यशस्वी ठरलो, तरच आपले जीवन सार्थक होत असते. त्यामुळे हा न्याय देण्यासाठी माहिती अधिकार प्रभावीपणे वापरला गेला पाहिजे.

प्राचार्य सोपानराव निंभोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा करत असताना विद्यापीठामुळे मिळालेल्या शैक्षणिक सुविधांचा समाज उपयोगी वापर कसा झाला, याबाबत सांगितले. माहिती अधिकार क्रांतिकारी ठरत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचा सर्व स्टाफ आणि चारशेच्या वर विद्यार्थी यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा