बीड शहरात `ऑनलाईन चक्री`तून कोट्यावधींची उलाढाल; पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष; पेठ बीड, बस्थानक परिसर बनला जुगाराचा आड्डा, सुशिक्षित युवक अवैध धंद्याकडे वळू लागले




बीड –
पोलिसांना हप्ता दिला की, कोणताही अवैध धंदा सहज उभा करता येतो असा बीड शहरात आणि जिल्ह्यात अलिखीत नियमच झाला आहे. त्यामुळे येथील युवक कष्टाच्या कामाकडे दुर्लक्ष करुन अवैध धंद्याकडे वळत आहेत. बीड शहरातील पेठ बीड भाग आणि बस्थानक परिसर `ऑनलाईन चक्री‘, अवैध धंद्याचा आड्डा बनला आहे. मात्र यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून या अवैध धंद्याकडे विशेष म्हणून असलेल्या काही शाखेतील पोलिस अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात. त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात अवैध धंदे वाढल्याने रोज कोठे ना कोठ खून, दरोडा, बलात्कारांसारखे गंभीर एफआयआर दाखल होताता. कायदा आणि सुव्यवस्था अबादीत राखणारे बीडचे काही पोलिस गुन्हेगारांच्या सोबतीला दिसत असल्याने सर्वसामान्य नागरिक भयभीत होत आहेत. यातच येथील तरुणांना रोजगारांच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा तरुन अवैध धंद्याकडे वळला जात आहे. पोलिसांना हाप्ता दिला की आपल्याला अवैध धंद्याचा परवानाच मिळाल्यासाखरे हे धंदे खुलेआम सुरु आहेत. सध्या बीड बसस्थानक परिसरात आणि पेठ बीड भागात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन चक्री नावाचा जूगार खेळला जात आहे. या जुगारातून दिवसाला कोट्यावधींची उलाढाल बीडमध्ये होते. यातील बराच माल विशेष म्हणून असलेल्या काही शाखेला जातो. त्यामुळे ते इकडे डुंकूनही पाहत नाहीत.

कर्तव्यदक्ष एसपी नंदकुमार ठाकुर यांनी लक्ष देण्याची मागणी
पोलिस अधिक्षक पदाचा पदभार घेताच नंदकुमार ठाकुर यांनी जिल्ह्यात फिरुन प्रत्येक पोलिस ठाण्याचा आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. पोलिसांना योग्य सूचना केल्या. तर कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना झापलेही. कोठे काही घटना घडली तर कर्तव्यदक्ष अधिकारी नंदकुमार ठाकुर स्वत: घटनास्थळावर जातात. तेथील परिस्थितीचा आढावा घेतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस दलाचे आणि पोलिस ठाण्याचे काम अभिनंदनीय आहे. पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांचा आजपर्यंत कारभार कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून राहिलेला आहे. मात्र काही विशेष शाखेत सुरु असलेल्या अनागोंधी कारभरावरुन पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. याकडे स्वत: पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

…तर दिखाव्यासाठी कारवाया
शहरात सुरु असलेल्या ऑनलाईन चक्री जुगाराबाबात स्थानिक गुन्हे शाखलेला खडान्‌‍ खडा माहित आहे. मात्र ते केव्हाच धाड टाकत नाहीत. पोलिस अधिक्षकांनी अवैध धंद्यावर कारवाया करण्याचे आदेश दिल्यानंतर केवळ हातभट्टीवाले उचल्ले जातात. त्यांच्याकडूनही हाप्ते सुरु असतात मात्र नाइलाजास्तव कारवाई करावी लागते. तर केव्हा केव्हा हाप्ता वाढून घेण्यासाठीही कारवाया केल्या जातात.

ऑनलाईन चक्रीत ‘आनंदही आनंद`
पेठ बीड आणि बस्थानक परिसरात सुरु असलेल्या ऑनलाईन चक्री जुगारात ‘आनंदही आनंद` असल्याने पोलिसांनाही ‘आनंद` भेटतो म्हणून येथे कधीही धाड पडत नाही. त्यामुळे जुगार खेळणारेही या ‘आनंद`कडे वळतात. मात्र खेळात `आनंद` आसला तरी पैसे गेल्याने त्यांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा