लोकोपकार शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यालयाचे थाटात शुभारंभ शेतकऱ्यांचे हित जोपासत काम करण्याचा निर्धार




लोकोपकार शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यालयाचे थाटात शुभारंभ शेतकऱ्यांचे हित जोपासत काम करण्याचा निर्धार

किल्लेधारूर  l

लोकोपकार शेतकरी उत्पादक कंपणीची स्थापना धारूर तालूक्यातील शेतकऱ्यांचा समूह तयार करण्या साठी शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करून मालाला जास्त भाव मिळवून देणे नविन तंञज्ञान शेतकऱ्यांना आवगत करणे या साठी हि संस्था प्राधन्याने काम करणार असून यांसंस्थेचे उदघाटन तहसीलदार दत्ता भारस्कर व सुभाष साळवे यांचे हस्ते व मान्यवराचे उपस्थीतीत करण्यात आले.


शेतकरी उत्पादक संस्था स्थापना व प्रोत्साहन या केंद्रीय योजने अंतर्गत लोकोपकार शेतकरी उत्पादक कंपणी दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांचे मार्गदर्शना खाली स्थापन करण्यात आली असून या संस्थेचा उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. या कर्यक्रमाचे उदघाटक म्हणुन तहसीलदार दत्ता भारस्कर हे उपस्थीत होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आत्मा बीड चे प्रकल्प संचालक सुभाष साळवे हे होते. यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक टी एल मारकड कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्ञज्ञ डाॕ वंसतराव देशमूख, तालूका कृषी अधिकारी शरद शिनगारे नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, बीड जिल्हा सिताफळ संघाचे अध्यक्ष रामराव लगड,पञकार अनिल महाजन हे उपस्थीत होते. या वेळी संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन पर भाषणात तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी शेतकऱ्यांनी सामूहीक पणे शेती करणे आवश्यक असून. शेतकऱ्यांना आर्थीक बळकटी देऊन उत्पादन वाढीसाठी संस्था फायदेशीर काम करेल असा विश्वास व्यक्त करून चांगल्या मालाची निर्मीती करून शेतकऱ्यांचे उत्पन्नाला भाव मिळवून देण्यासाठी संस्थेने बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांना नविन तंञज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. असे सांगत या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांन निश्चीत फायदा होईल असे हि सांगीतले. अध्यक्षीय भाषणात आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी आपल्या कडे शेतकऱ्यांचे शेतीचे लहान लहान तुकडे असल्याने सामूहीक शेती करणे आवश्यक असून या शेतकरी कंपणीचा शेतकऱ्यांन फायदाच होईल. संचालकाची माञ मोठी जबाबदारी असल्याचे सांगीतले. शेतकऱ्यांचे विश्वासाला त्यांनी पाञ ठरावे तसे काम उभे करावे असे सांगीतले. तालूका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी शेतकऱ्यांन त्यांचे उत्पन्नाचा भाव स्वतःला ठरवता आला पाहीजे नविन तंञज्ञानाचा वापर करत उत्पादन वाढवले पाहीजे. फळबाग शेती कडे लक्ष केंद्रीत केले पाहीजे असे सांगीतले. कृषी विज्ञान केंद्राचे डाॕ वंसतराव देशमूख यांनी शेतकरी सामूहीक झाल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबेल. शेतकरी आर्थीकदृष्ट्या सदन होईल असा विश्वास व्यक्त केला. रामराव लगड यांनी सिताफळ उत्पादनातील अडचणी व उपाय यावर मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी पञकर अनिल महाजन आदीनी आपले विचिर व्यक्त केले. कर्यक्रमाचे प्रास्तावीक संस्थेचे संचालक जयप्रकाश तोष्णीवाल यांनी तर सुञसंचलन अनिल जोशी तर अभार हनूमान बडे यांनी मानले या कार्यक्रमाला शेतकरी नागरीक संस्थेचे सर्वा संचालक व संभासद उपस्थीत होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा