आयडॉल..कोवीडयोद्धेनचा अभिमान !
आयडॉल..कोवीडयोद्धे
बीड।

देशभर व आपल्या राज्यात ,जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.दुसरी लाट खरच भयानक आहे अनेक निरापराध लोक गेली.तीही जवळचीच.एवढ्या मोठ्या संकटात बोटावर मोजण्याईतकी राजकीय लोक मदतीला धावली,अनेक सामाजीक कार्यकर्ते मात्र आजही कुठल्या पदाची कौतुकाची अपेक्षा न करता लढत आहेत..मदतीला धावुन जात आहेत.
अमरनाना व फारुकजी पटेल  –
बीडशहरात नगर सेवक मात्र जिल्हाभरातुन रोज हजारो फोन येताहेत बेडच्या मदतीसाठी…हे दोघ गेली वर्षभर दिवसरात्र मेहनत घेत आहेत व स्वत रोज कोवीड वार्डचा राउंड करत आहेत.बीड शहरात फक्त या दोन राजकीय मित्रांच नजरेत भरणार काम दिसत आहे.सलाम या दोघांना.

सुरेशजी कुटे–
तिरुमला आॅईलचे मालक जिथे कमी तिथे मदत पोहचवत आहेत.बीड शहरात दिवसभर एक व्हॅन फिरते त्यात पाणी बॉक्स,पारलेजी,व चहा उपलब्ध आहे पोलीस व आरोग्य बांधवासाठी व रस्त्यावर बसलेल्या निराधारांसाठी तो ही कुठलीही जाहीरात न करता मोफत.जिल्हा रुग्नालयासमोर अन्नछत्र उभारून पेशंटच्या नातेवाईकांची भुक भागवली जात आहे.हजारो लोक येथे रोज पोटभर मोफत जेवत आहेत.
संतोष सोहणी-
व्यापारी महासंघाला सोबत घेत मॉ.वैष्णवी पॅलेस येथे गरजुना मोफत जेवन दिले गेले पहिल्या लाटेत व कोवीड सेंटरही.आज कोवीड सेंटर मधे अनेकजन उपचार घेत आहेत.रेमडेशिवीर चा होणारा शहरातील काळाबाजार संतोषशेठने उघडकीस आणला.
बालाजी मारगुडे–
व्रतपत्र क्षेत्रात काम करत असलेला बालाजी टिमला सोबत घेऊन रेमडेशिवीरचा काळा बाजार रोखत आहे व जिल्ह्याला रोज उपलब्ध झालेली औषधे रुग्नांना मिळतात का यावर देखरेख करत आहे…आता याबरोबरच त्याने सोशल मिडीयावर लस बाबत जाग्रती सुरू केली आहे व रोजचे अपडेट तो देत आहे.
अभिजीत बरीदे-
कट्टर सैनिक असलेला हा मित्र रक्तदान शिबीरे शहरातील विविध भागात घेण्यासाठी अनेकांना प्रोत्साहीत करत आहे व तातडीच्या उपचारासाठी मदतही..अर्जंट रेमडेशिवीर उपलब्ध करुन देणारा भैय्या अशी ओळख तयार झाली आहे.
दिपक कुलकर्णी–
घरात सहा महिन्याचे लेकरु असताना दिपक सकाळी नऊ ते रात्री दहा रुग्नांना मदत व्हावी यासाठी उपलब्ध आहे..कुठल्याही आजाराने रुग्न दगावला तर लोक मदतीला येत नाहीत तिथे उपस्थित दहा लोकात दिपक कुलकर्णी असतोच.
साईदास आई- बाबा सेवा केंन्द्र बीड.
बीड शहरातील जेष्टांना लसीकरणासाठी मोफत केंन्द्रावर जाण्याची सेवा बजावत आहेत.
मनोज अग्रवाल–
बीड शहरातील व्यवसाईक मनोजने लस केंन्द्रावर पाण्याचे जार ठेवुन पुण्याचे काम सुरु केले आहे.
कोवीड सारख्या कडक लॉगडाउन मधेही हे बंधु वेडे होवुन मदतीसाठी धावत आहेत याचा बीडकर असल्याने मला अभिमान वाटतो.
या कोवीड योद्ध्यांचे आरोग्य उत्तम रहावो हिच अपेक्षा.मी पाहीली,अनुभवली त्यांचा उल्लेख मी केलाय..अशी शहरात व जिल्ह्यात अनेक आहेत ते ही मदत करत आहेत. ती आपण कॉमेंट मधील ईनबॉक्स मधे सांगावीत ही अपेक्षा.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा