गोवर्धन पवार यांना राष्ट्र शिल्पकार पुरस्कार
 

बीड

शहरातील यशवंत माध्यमिक विद्यालय या शाळेचे क्रीडा व सामाजिक विषयाचे कर्तव्यदक्ष शिक्षक गोवर्धन नवनाथराव पवार यांना रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल यांच्या वतीने राष्ट्र शिल्पकार पुरस्कार एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल चे अध्यक्ष परमेश्वर जाधव, सचिव रवी उबाळे या सर्व मान्यवरांच्या हस्ते गोवर्धन पवार यांचा सन्मान करण्यात आला. गोवर्धन पवार हे गेल्या आठ वर्षापासून यशवंत माध्यमिक विद्यालय बीड या शाळेत सामाजिक शास्त्र या विषयाचे अध्यापन करतात. तसेच ते क्रीडा शिक्षक म्हणून ही काम पाहतात. त्यांनी आत्तापर्यंत अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेला यश मिळवून दिले आहे. ते एक विद्यार्थी प्रिय व शिस्तबद्ध शिक्षक आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल यांच्या वतीने करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सुधामती ताई वाघ, शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोविंदरावजी वाघ, यशवंत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश वाघ, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर धुमाळ यांनी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा