दंतरोग चिकित्सा व उपचार शिबीराचे आ. संदिप क्षिरसागार यांच्या हस्ते उद्घाटण संपन्न




दंतरोग चिकित्सा व उपचार शिबीराचे आ. संदिप क्षिरसागार यांच्या हस्ते उद्घाटण संपन्न

मराठवाडा पत्र न्यूज बीड   : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात शासकिय नवरात्री उत्सवाचे औचीत्य साधून सोमवार दिनांक २६ सप्टें. २० २२ पासून १८ वर्षा वरिल सर्व महिलांच्या आरोग्य तपासणी साठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे उद्घाटन दिनांक २७ सष्टें . २०२२ रोजी मा. आ . श्री . संदिप क्षिरसागर , शिवसेना जिल्हा प्रमुख मा. श्री . कुंडलिक खांडे , मा . श्री . सचिन मुळूक , भाजपा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र मस्के . जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते , ॲड. बागल , श्री . गणेश उगले , निवासी वैद्यकिय अधिकारी ( बा. स . ) डॉ . राम आवाड अधि सेविका श्रीमती रमा गिरी , सहाय्यक अधिसेविका श्रीमती महानवर , परिसेविका श्रीमती सुजाता जाधव , श्रीमती यादव , श्रीमती सरकटे , श्रीमती सय्यद इ. उपस्थित होते . व या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री . मते यांनी केले .
जिल्हा शल्य चिकित्सक , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हुबेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले . प्रास्ताविक डॉ. अमोल गित्ते यांनी केले . प्रमुख मार्ग दर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी करूण १८ वर्षा वरिल महिलांची आरोग्य विषयक तपासनी , हिमोग्लोबीन , रक्त गट , मधुमेह तपासून घेण्याचे आव्हाण केले . दंतरोग चिकित्सा शिबीरामध्ये एकूण १०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्या पैकि ३९ रुग्णास शस्त्रक्रिया करण्यासाठी बोलावण्यात आले आहे .
या कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालय , शाळा , उपजिल्हा तसेच ग्रामिण रुग्णालयातील महिला व १८ वर्षा वरिल किशोर वयीन मुलिंना आहाराचे , व्यायामाचे , स्तनदा मातांना स्तना पानाचे महत्व , कुटुंब नियोजनाचे महत्व व अशक्तपणा , थायरॉईड , मासिक पाळीचे आजार , आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात आले . या मोहिमे अंतर्गत संपूर्ण जिल्हात आज पर्यंत १८३० महिला व किशोर वयीन मुलिंचे समुपदेशन करण्यात आले .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा