माता सुरक्षित तर घर सुरक्षित आरोग्य अभियानांतर्गत तुलसी कॉलेज मध्ये विद्यार्थिनींना मार्गदर्शन
माता सुरक्षित तर घर सुरक्षित आरोग्य अभियानांतर्गत तुलसी कॉलेज मध्ये विद्यार्थिनींना मार्गदर्शन

बीड

-तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड येथे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’
आरोग्य अभियानांतर्गत विद्यार्थिनींना मार्गदर्शन कण्यासाठी प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता केले होते.या शिबिरास आरोग्य मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा बीडचे समन्वयक संतोष हरणमारे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी प्रास्ताविकात प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी तान, तणावामुळे होणारे आजार आणि त्याचे महिलांवर होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, धकाधकीच्या या जीवनामध्ये महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नसल्यामुळे त्यांना असंख्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी राज्य शासनाने नवरात्री उत्सवाच्या काळात सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर यादरम्यान आरोग्य अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये वय १८ वर्षावरील प्रत्येक मुली,महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित, या अभियानाची माहिती सर्व मुली,महिलांना मिळावी या उद्देशातून तुलसी कॉलेज बीड येथे आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे प्राचार्य निकाळजे यांनी सांगितले. या आरोग्य शिबिराचे प्रमुख मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा बीडचे समन्वयक संतोष हरणमारे यांनी आरोग्य म्हणजे काय, आहाराचे महत्व, भावनिक आणि मानसिक बदल, नैराश्य, फुफुसांचे आजार, हृदयाचे आजार, कर्करोग, मधुमेह, मानसिक विकार, रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि त्यामुळे होणारे विविध आजार, मासिक पाळी, धार्मिक गैरसमज आणि गर्भधारणा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. चुकीचा नॉलेजमुळे होणारे प्रॉब्लेम यावर देखील डॉक्टर हरणमारे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना आरोग्य विषयी सखोल माहिती दिली. यावेळी प्रा.प्रकाश ढोकणे, प्रा.डॉ.योगिता लांडगे,प्रा.शिल्पा बोराडे,प्रा.डॉ.भाग्यश्री पवार,प्रा.स्वाती साबळे,प्राची पाठक,प्रा.सय्यद शहाणा,प्रा.प्रियंका बचुटे,प्रा.सुधर्मा सावजी,प्रा.मोनिका भालेराव,प्रा.अन्विता राक्षे,सुनीता साळुंके,संजय धुरंधरे यांच्यासह विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा