पत्नी व मुलाची साखर झोपेतच कुर्हाडीने हत्या
पत्नी व मुलाची साखर झोपेतच कुर्हाडीने हत्या
——————————————-
माजलगाव दि.११
माजलगाव तालुक्यातील मंजरथ ग्रा.पं.संलग्न काळे वस्ती(अहिल्यानगर)येथे राहणाऱ्या एका युवकाने पत्नी व आठ वर्षांच्या मुलाची कुर्हाडीने घाव घालून हत्या केली.विशेष म्हणजे आरोपीने घटनेची माहिती स्वतः पोलीसांना दिली.


या विषयी अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील मंजरथ ग्रा.पं.संलग्न काळे वस्ती (अहिल्यानगर) येथील पांडुरंग शिवाजी दोडताले या युवकाने आज पहाटे साखर झोपेत असणारी पत्नी लक्ष्मी वय (२८) व मुलगा पिल्या वय(८)या दोघांना कुर्हाडीने सपासप वार करून हत्या केली.पत्नी व मुलाची हत्या करून घटनेची माहिती स्वतः माजलगाव ग्रामीण पोलीसांना दिली.पहाटेच घटनास्थळी पोलीसांनी भेट घेवून आरोपी पांडुरंग शिवाजी दोडताले यास अटक करण्यात आले.या घटनेची मंजरथ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नेमकी घटना कशामुळे घडली याचा पोलीस तपास करत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा