इमामपूर मध्ये प्रथमच मंत्री महोदय आणि महाराष्ट्र केसरी पैलवान आल्याने ही यात्रा कायम जनतेच्या आठवणीत राहील -बाजीराव चव्हाण




इमामपूर मध्ये प्रथमच मंत्री महोदय आणि महाराष्ट्र केसरी पैलवान आल्याने ही यात्रा कायम जनतेच्या आठवणीत राहील -बाजीराव चव्हाण

कुस्तीच्या आखाड्याला आ.शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगने आली रंगत

बीड
बीड तालुक्यातील इमामपूर येथील यात्रेनिमित्त कुस्त्याची दंगल आयोजित करण्यात आली होती आणि या यात्रेनिमित्त माझ्या जन्मभूमीत हेलिकॉप्टर मध्ये मंत्री महोदय यावेत अशी माझी बालपणापासून इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आणि माझ्या विनंतीला मान देऊन राज्यउत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराजे देसाई,आमदार शहाजी बापू पाटील ,आमदार संजय शिरसाट यांनी हजेरी लावल्याने आणि महाराष्ट्र केसरी पैलवान कुस्तीसाठी आल्याने ही यात्रा कायम ग्रामस्थांच्या आठवणीत राहील असे बाजीराव चव्हाण यांनी म्हटले .

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय युवा उद्योजक बाजीराव चव्हाण यांनी शुक्रवारीयात्रेनिमित्त इमामपूर येथे कुस्त्याची दंगल आयोजीत केली होती या कार्यक्रमास राज्यउत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराजे देसाई,आमदार शहाजी बापू पाटील आमदार संजय शिरसाट यांची उपस्थिती होती यावेळी शहाजी बापू पाटील यांनी आखाड्यात जनतेची गर्दी पाहून काय इमामपूरचा डोंगर ,काय झाडी समदं ओके म्हणताच जनतेने टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्या फुकुन शहाजी बापूंच्या डायलॉगला दाद दिली आणि कुस्तीच्या आखाड्याला चांगलीच रंगत आली
आणि सर्वत्र बापूंच्या डायलॉगची चर्चा चालू झाली विशेष म्हणजे पहिल्यांदा असे मंत्री महोदय हेलिकॉप्टर मध्ये आल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती .

उप महाराष्ट्र केसरी पै अक्षय शिंदेंनी जिंकली 2 लाखाची कुस्ती

इमामपूर मध्ये प्रथमच नामांकित पैलवान कुस्तीच्या आखाड्यात उतरले होते त्यामध्ये महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख ,त्रिमूर्ती केसरी पै माऊली कोकाटे, उप महाराष्ट्र केसरी पै अक्षय शिंदे हे होते उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांनी ,पै बालारफिक शेख (महाराष्ट्र केसरी) यास अस्मान दाखवले ,दोन लाख रोख रक्कम आणि अडीच किलो चांदीची गदा देऊन सन्मान केला
त्रिमूर्ती केसरी पै.माऊली कोकाटेनी यांनी दुसरी कुस्ती जिंकल्याने दीड लाख रोख व अडीच किलो चांदीची गदा देऊन दोन्ही पैलवानांना आयोजक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा