महावितरणलां रा. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण पवळ यांचे निवेदन
  • महावितरणच्या विरोधात रा. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण पवळ यांचे निवेदन

शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा खंडित करु नका

महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे पवळ यांच्यासह शेतकर्‍यांची मागणी

बीड । प्रतिनिधी

काही शेकऱ्यांकडे वीज बीला थकीत असून  शेतकर्‍यांच्या कृषीपंपाचे विद्युत कनेक्शन कट करण्याचा महावितरणने सपाटा लावला आहे. यामुळे शेतातील उभे पीके पाण्या अभावी सुकू लागल्याने शेतकर्‍यांमध्ये महावितरणच्या या अडमुठ्याधोरणा विरोधात संताप व्यक्त केल्या जात असून काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण पवळ यांच्याकडे शेतकर्‍यांनी तक्रारी केल्यानंतर महावितरणच्या जुलमी कारवाई विरोधात लक्ष्मण पवळ यांनी  महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे शेतकर्‍यांची या वर्षी झालेलि अतिवृष्टी व त्यामुले आपण कृषी पंपाचे कनेक्शन कट न करता शेतकर्‍यांना सवलत द्यावी, अशी मागणी केली. बीड जिल्ह्यात थकीत वीज बीलापोटी शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन कट करण्याची मोहिम महावितरणने जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून राबविली आहे. एकीकडे उद्योग व्यवसायीकांकडे लाखो-करोडो रुपयांची थकबाकी असतांना शेतकर्‍यांना मात्र धारेवर धरत धनदांडग्यांना मुभा देण्याचे काम महातिवरण करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महावितरणच्या या अडमुठ्या धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. सोमवारी जालनारोडवरील महावितरणच्या कार्यालयात मुख्य कार्यकारी अभियतां यांच्याकडे काही शेतकरी गेले मात्र त्यांचे गार्‍हाणे ऐकले जात नसल्याची तक्रार काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण पवळ यांच्याकडे शेतकर्‍यांनी केली. दरम्यान तत्काळ लक्ष्मणदादा यांनी महावितरणच्या कार्यालयात येवून मुख्य कार्यकारी अभियंत्यांना शेतकर्‍यांच्या समस्या मांडून महावितरणची थकबाकी वसूलीच्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकूटीला आला असून कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन कट केल्याने शेतातील उभे पीके जळून जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात येवून लागलाय. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन कट न करता त्यांना सवलत द्यावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण दादा पवळ यांनी दिला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा