पुसरा येथे लक्ष्मी आई यात्रेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा- सरपंच रामराव सावंत यांचे आवाहन.
पुसरा येथे लक्ष्मी आई यात्रेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा- सरपंच रामराव सावंत यांचे पुसरा

वडवणी प्रतिनिधी
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी पुसरा येथील लक्ष्मी आई यात्रेचं आयोजन गावकऱ्यांच्या वतीने केलेलं आहे. तरी या यात्रेला जिल्हा भरातून व अनेक ठिकाणाहून लोक या यात्रेला येत असतात आणि गावची शोभा वाढवत असतात म्हणून पुसरा येतील लक्ष्मी आईच्या यात्रेला तालुका व जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुसरा गावचे नवनिर्वाचित सरपंच रामराव सावंत यांनी केले आहे. सविस्तर वृत्त असे की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पुसरा येतील लक्ष्मी आईची यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये महासूर आहे. महाराष्ट्रातून या यात्रेसाठी लोक येत असतात शुक्रवार दिनांक 13 1 2023 रोजी ताजी यात्रा असते आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल मोठ्या प्रमाणात असते. महाराष्ट्रभरातून या यात्रेला कुस्ती खेळण्यासाठी नामांकित पैलवान येत असतात याही वर्षी नामांकित पहिलवान यांनी या पुसरा गावच्या यात्रेमध्ये सहभागी होऊन गावची शान वाढवावी व आपलंही कौशल्य दाखवावं असं आवाहन पुसरा गावकऱ्यांच्या वतीने सरपंच रामराव सावंत यांनी केले आहे. तसेच यावर्षी हरिभाऊ राठोड नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा पुसरा येथे दिनांक 13 1 2023 रोजी सायंकाळी आयोजित केला आहे. तरी परिसरातील व पंचक्रोशीतील जनतेने या कलावंतांना सपोर्ट करून त्यांच्या कलेचा आदर करावा आणि शनिवार दिनांक 14 1 2023 रोजी दुपारी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. तरी वडवणी तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यामधून नामांकित पैलवानांनी या कुस्तीच्या फडामध्ये आपलं कौशल्य दाखवावं आणि या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुसरा गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा