बीड पोलीस संघाचा एडीएफसी संघावर थरारक विजय
सत्यजित जाधवच्या भेदक गोलंदाजीने एफीएफसीचा संघ 144 धावांवर रोखला

बीड (प्रतिनिधी)ः- क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणार्‍या आणि षटकामागे धावसंख्येचा बदल दाखवत बीड पोलीस संघाने यजमान एडीएफसी क्लबच्या संघावर सत्यजीत जाधव यांच्या भेदक गोलंदाजीने एकतर्फी विजय मिळविला. दि. 17 जानेवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून एडीएफसी क्लबने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकात 9 फलंदाज बाद होत या संघाने 145 धावांचे लक्ष्य बीड पोलीस संघाला दिले होते. बीड पोलीसच्या संघाने सुरेख फलंदाजीत अवघ्या 14.5 षटकात हे लक्ष्य सहज पार केले. बीड पोलीसकडून उत्कृष्ट गोलंदाजी करणार्‍या सत्यजीत जाधवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर या सामन्याचे नाणेफेक बीड पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पोलीस उपाधिक्षक संतोष वाळके, बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष भुषण पवार, संजय उढाण, दिलीप काळे  यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरु अलेल्या एडीएफसी राज्यस्तरीय लेदर बॉल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सातव्या दिवशी खेळवल्या गेलेल्या एडीएफसी क्लब विरुध्द बीड पोलीस क्लब संघाचा आज क्रिकेट प्रेमींची उत्कंठा वाढवणारा खेळ पहायला मिळाला. हा सामना पहाण्यासाठी प्रमुख पाहुणे व बक्षीस वितरक म्हणून सोमनाथ धांडे, नवनाथ प्रभाळे, पिंटुशेट नखाते, विनोद पांचाळ, संदीप गोरे, अ‍ॅड.सागर नाईकवाडे आकाश राऊत, अ‍ॅड.सुधीर जाधव, मनोज वाघमारे, अजय जाधव या मान्यवरांची उपस्थिती होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या एडीएफसी संघाने बीड पोलीस संघासमोर 9 फलंदाज बाद होत 145 धावांचे आव्हान बीड पोलीस संघासमोर ठेवले होते. सदरील आव्हान बीड पोलीस संघाने 14.4 षटकात सहजरित्या पार केले. या सामान्याचा सामनावीर पुरस्कार बीड पोलीस संघाचा सत्यजीत जाधव याला देण्यात आले. सर्व सामने यशस्वी पार पाडण्यासाठी एडीएफसी क्रिडा मंडळाचे अध्यक्ष अजय जाधव, उपाध्यक्ष अख्तर भाई, सचिन गायकवाड, रामेश्वर घाडगे, मनोज जोगदंड, प्रा. विजय जाधव, अ‍ॅड. सागर नाईकवाडे, पिंटूसेठ नखाते, संदीप गोरे, महेश चौरे, अ‍ॅड.सुधीर जाधव यांच्या सर्व सदस्य मोलाचे योगदान  .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा