शेळ्या चरण्यासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस् गर्भावती केले,आरोपीस 20 वर्षाची शिक्षा




संभाजीनगर

शेळ्या चरण्यासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या या आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावला. सोबतच ठोठावलेल्या दंडापैकी 20 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडितेला देण्याचे आदेशात म्हटले आहे. राहुल पंडित मगरे (वय 21 वर्षे, रा. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन पीडितेच्या आईने हर्सूल पोलिसात दिलेल्या फिर्यादिवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या आईने हर्सूल पोलिसात दिलेल्या फिर्यादिनुसार, पीडीत मुलगी सकाळी 11 वाजता बकऱ्या चरण्यासाठी घेऊन जायची आणि सायंकाळी पाच वाजता घरी येत होती. दरम्यान परिसरात राहणारा राहुल पंडित मगरे हा देखील पीडितेसोबत बकऱ्या चयारला नेत होता. त्यामुळे दोघांची ओळख झाली होती.

पीडितेवर केला बळजबरीने अत्याचार

दरम्यान एक दिवस पीडिता ही नेहमीप्रमाणे बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेली असता, आरोपीने तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने बकऱ्या दुसरीकडे चरण्यासाठी नेल्या. मात्र घटनेच्या सुमारे 15 दिवसांनंतर पीडिता बकऱ्या चरण्यासाठी कोलठाणवाडी परिसरात घेऊन गेली असता, आरोपी तिला तेथे येऊन भेटला. तसेच त्याने पुन्हा पीडितेवर बळजबरी बलात्कार करून धमकी दिली.

बहिणीकडे गेल्यावर उघडकीस आला प्रकार

आरोपीने अत्याचार केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने याबाबत कोणालाही काहीही सांगितले नाही. दरम्यान 3 नोव्हेंबर 2019 रोजी दिवाळीनिमित्त मुलीची आई आपल्या कुटुंबासह बहिणीकडे गेल्या होत्या. त्यावेळी पीडीत मुलीच्या बहिणीला पीडितेचे ओटीपोट वाढलेले दिसले. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना दाखवले असता, पीडिता सात ते आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला!

पीडीत मुलगी दिवाळीनिमित्ताने आपल्या आईसोबत आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. यावेळी बहिणीला पीडितेचे ओटीपोट वाढलेले दिसल्याने तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करत पीडिता सात ते आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्याने पीडिताच्या कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा