श्री.सोमेश्वर महादेव मंदिर येथे 20 वर्षाची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताहस 12 फेब्रूवारी पासून सुरुवात
श्री.सोमेश्वर महादेव मंदिर येथे 20 वर्षाची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताहस 12 फेब्रूवारी पासून सुरुवात

बीड पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हरिनाम सप्ताहात निमित्त सुश्राव्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा- नवनाथआण्णा शिराळे

बीड प्रतिनिधी :-
श्री.सोमेश्वर महादेव मंदिर येथे गेल्या 20 वर्षाची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने रविवार दि.12 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होत आहे.
ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या प्रेरनेने ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे हे गेल्या 20 वर्षांपासून या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करत आहेत.
ह.भ.प.माधव महाराज डाके यांच्या शुभ हस्ते कलश स्थापना आणी सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने सुरुवात होत आहे. कीर्तनकर – रविवार दि.12/02/2023 रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज रकताडे पिंपरखेड,सोमवार दि.13 ह.भ.प.अक्षय महाराज पिंगळे,मंगळवार दि.14 ह.भ.प.दत्तात्रय महाराज मिसाळ, बुधवार दि.15 ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे, गुरुवार दि.16 ह.भ.प.योगीराज महाराज स्वामी , शुक्रवार दि.17 श्रीराम महाराज चोले, शनिवार दि.18 ह.भ.प.रंधवे बापू महाराज यांचे कीर्तन होतील. रविवार दि.19 फेब्रुवारी ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली मंझरीकर यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल.
प्रवचनकर – ह.भ. प. बाबुराव गोपीनाथराव मुंडे महाराज, ह. भ. प. श्रीमंत तांदळे महाराज ,ह. भ .प . करमाळकर महाराज, ह. भ. प. सुमितिताई पिंगळे महाराज, ह.भ. प. रमेश वायभट महाराज, ह. भ. प. सखाराम जाधव महाराज,ब.ब्र. 108 डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज , ह.भ.प.मुरलीधर नवले महाराज, ह. भ. प. अरुण नाना डाके महाराज, ह. भ. प. रामेश्वर थोरबोले महाराज, ह.भ. प. भीमाशंकर तट महाराज, ह. भ. प. हनुमान महाराज शेळके, ह.भ. प. डॉक्टर भागवत मोरे महाराज यांचे प्रवचण होतील.
हरिनाम सप्ताहात रोज पहाटे चार ते सकाळी सहा काकडा, सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी दहा ते दुपारी बारा तुकाराम गाथाभजन, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रोज रात्री नऊ ते अकरा कीर्तन व तद्नंतर हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
या नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. श्री. सोमेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्षय नवनाथ आण्णा शिराळे व श्री.सोमेश्वर विस्वास्त मंडळ व भक्तगन यांनी या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा