सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा – नवनाथआण्णा शिराळे
श्री सोमेश्वर मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताची आज सांगता

सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा – नवनाथआण्णा शिराळे

 

बीड (प्रतिनिधी)ः- शहरातील सोमेश्वर महादेव मंदिर येथे प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी दि. 12 फेब्रुवारी ते 19 फेबु्रवारी दरम्यान महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या प्ररणेने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 19 फेब्रुवारी रोजी या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असून या प्रसंगी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज मंझरीकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे. भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोमेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सचिव नवनाथआण्णा शिराळे व विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.


शहरातील बार्शी रोडवर असलेल्या श्री सोमेश्वर महादेव मंदिर येथे गेल्या 20 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन, रामायण असे भरगच्च

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहा दरम्यान तुकाराम महाराज रकताडे, अक्षय महाराज पिंगळे, दत्तात्रय म.मिसाळ, लक्ष्मण महाराज मेंगडे, श्रीराम म.चोले, श्री. रंधवे बापू यांची कीर्तने तर बाबुराव म.मुंडे, श्रीमंत म.तांदळे, करमाळकर महाराज, सुमतीताई म.पिंगळे, रमेश म.वायभट, सखाराम म.जाधव, डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, मुरलीधर म.नवले, अरुणनाना डाके महाराज, केशव म.राजगुरु, रामेश्वर म.थोरबोले, भिमाशंकर म.तट, हनुमान म.शेळके, डॉ.भागवत म.मोरे यांची प्रवचने संपन्न झाली. तर आज दि.19 रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली मंझरीकर महाराज यांचे सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी या प्रसंगी भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हा सचिव नवनाथआण्णा शिराळे,पांडुरंग जानवळे, प्रदीप बाब्रस, सदाशिव शेजाळ, बाबासाहेब शिंदे, प्रधान पवार, बाळूभाऊ गलधर, दोडके सर, हरिदास जोगदंड, महादेव आंधळकर, श्रीराम मुळे सर, श्रीहरी वाघमारे, बंडूभाऊ कदम, आत्माराम शिराळे, वसंतराव कदम, विनोद अनिल परंडकर, अनिलनाना धांडे, दिपक कदम, नागोराव काकडे, दत्तात्रय नरनाळे, बाबु परळकर, जालिंदर कातांगळे व विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा