गावात चांगले काम करायचे असेल तर आधी विरोधकांचे पाय धरा -पवार




 

पानी फाऊडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा कार्यशाळा जी प चे मुख्यअधिकारी अजित पवार यांच्या उपस्थितीत सपन्न

केज

राज्यात प्रसिद्ध सिने अभिनेते अमीर खान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा पडलेल्या पावसाच्या माध्यमातून विकास व्हावा त्या पावसाचे पाणी आपल्या जमिनीत मुरावे पाण्याचे महत्त्व कळावे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी ही संकल्पना लक्षात घेता. आता पुन्हा नव्याने जसी वाटर कप स्पर्धा होती. त्याच पद्धतीत सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा आता राज्यात सुरु होत आहे. त्याच अनुषंगाने 1 मार्च 2023 रोजी पंचायत समिती सभागृह केज येथे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अजित पवार साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या अध्यक्षतेखाली कार्य शाळा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अजित पवार यांनी सरपंचांना मार्गदर्शन करते वेळी आपल्या गावचा विकास करायचा असेल तर गावात सुरू असलेल्या कामावर आपण जातीने लक्ष दिले पाहिजे. आपण जे काम करत आहात त्या कामात आपण नफा कमवण्यापेक्षा दर्जेदार काम करावे. आपण केलेल्या कामाचे नाव आपण मेल्यास देखील आपल्या नातवाने नाव घ्यावे. असे कामे करा असा मोलिक सल्ला देखील यावेळी उपस्थितांना दिला. व डॉ.अविनाश पोळ मुख्य मार्गदर्शक पानी फाऊंडेशन, डॉ. ज्ञानोबा मोकाटे उपमुख्य कार्यकारी पंचायत विभागाचे डॉ. सचिन सानप .नरेगा गटविकास अधिकारी जिल्हा परिषद बीड, राजेंद्र मोराळे गटविकास अधिकारी पंचायत समिती केज, संतोष शिनगारे मराठवाडा समन्वयक पानी फाऊडेशन, प्रशांत वाघमारे तालुका कृषी अधिकारी, सविता शेप सहाय्यक गटविकास अधिकारी, अनिल चौरे विस्तार अधिकारी ( पं. ) पंचायत समिती केज, यांसह कार्यशाळेला केज तालुक्यातील सर्व गावातील सरंपच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ग्रामसेवक सखाराम काशिद व आभार प्रविण काथवटे तालुका समन्वयक यांनी मानले.

गट विकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांचे चोख नियोजन कार्यक्रम व्हावस्थित पार पाडण्यासाठी केज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी नियोजन एकदम चोख पणे राबवत उत्साहात पार पडला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा