कोरोनापासून बचावाचा कसा करावा या विषयी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर काय म्हणाले
कोरोनापासून बचावाचा कसा करावा या विषयी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर काय म्हणाले ?

Daily marathwada patra Team 16 May 2021 : कोरोनापासून शंभर टक्के बरे करणारे औषध अजूनही शोधले गेले नाही. त्यामुळे व्हॅक्सीन घेतली तरही मास्क, फिजीकल डिन्स्टिंसिंग आणि आवश्यक ती खबरदारी हाच एकमेव उपाय आहे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने डॉ. दीपक म्हैसेकर यांचे शनिवारी, दि.15 रोजी कोरोना : एक युद्ध या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यान पार पडले. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी ऑनलाइन सहभाग घेतला. यावेळी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून सादरीकरण करुन सुमारे 90 मिनिटे संवाद साधला. ते म्हणाले, गेल्या सव्वा वर्षांपासून जगभर कोरोना नावाच्या आपत्तीने थैमान घातलेले आहे. इटाली, इंग्लंड सारख्या प्रगत देशांची देखील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलेली आहे. आजघडीला तरी कोरोनातून संपुर्णत: बरे करणारे औषध निर्माण झालेले नाही. कोविशिल्ड, कोवॅक्सीन, स्पुटणीक आदी लस उपलब्ध झालेल्या आहे. रेडमेसिवार व अन्य उपायोजना केल्या जात आहेत, असे ते म्हणाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा