बीड बाजार समितीवर झेंडा फडकवण्यासाठी  शेतकरी महाविकास आघाडीची वज्रमुठ
बीड बाजार समितीवर झेंडा फडकवण्यासाठी

 शेतकरी महाविकास आघाडीची वज्रमुठ
बीड
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बदल घडविण्यासाठी शेतकरी महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. याअनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बीड बाजार समितीमध्ये चाललेल्या कारभाराचा पाढा पत्रकार परिषदेत वाचला. सत्तेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना लुटणार्‍यांना या निवडणूकीत खाली खेचून बीड बाजार समितीवर शेतकरी महाविकास आघाडीचा झेंडा फडकविणार असल्याचा विश्वास शेतकरी महाविकास आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आला
बीड येथील शासकीय विश्रामगृहात आज दि.8 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप,आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आ. सय्यद सलीम, सुशीलताई मोराळे , अशोक हिंगे, रवि दळवी, धनजय गुंदेकर, वंचितचे खाडे, गणेश बजगुडे, मस्के, बाळासाहेब घुमरे, महादेव धांडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख अनिल जगताप , आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड बाजार समिती मध्ये एकाच कुटुंबाची चाळीस वर्षांपासून सत्ता आहे.शेतकर्‍याला या कुटुंबाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आपण आघाडी केली आहे. प्रा सुशीला मोराळे यांनी या निवडणुकीत शेतकर्‍याला जयदत्त क्षीरसागर यांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी ही आघाडी केवळ बीड बाजार समिती पुरती मर्यादित असल्याचे सांगितले. दरम्यान बाजार समितीच्या माध्यमातून आ.संदिप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात सर्वपक्षीय मोट बांधली
माजी मंत्री क्षीरसागरांच्या पॅनल विरोधात एकवटले
बीड जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत.सर्वांचे लक्ष बीड बाजार समितीकडे आहे.कारण या ठिकाणी समितीच्या इतिहासात प्रथमच 158 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या बाजार समितीमध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनल च्या विरोधात शेतकरी महाविकास आघाडी नावाने पॅनल उभा केला आहे.शिवसेना ,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप,शेतकरी संघ,वंचित बहुजन आघाडी असे अनेक पक्ष आणि संघटना एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत.बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात शेतकरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीत परिवर्तन करण्याचा निर्धार आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आ.संदीप क्षिरसागर, सुशीलाताई मोराळे, माजी.आ.सलिम सय्यद, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे,काँग्रेस चे रविंद्र दळवी, गणेश बजगुडे , बाळासाहेब घुमरे,धनंजय गुंदेकर, संभाजी ब्रिगेड चे गणेश मस्के, आदी सहकारी मान्यवर उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा