देशात २४ तासांत चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाने घेतली बळी
देशात २४ तासांत चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाने घेतली बळी
गेल्या २४ तासांतील मृतांची आकडेवारी चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

Daily marathwada patra Team 16 May 2021


नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे कमी होत असताना मृत्यूंच प्रमाण अद्याप चार हजारांच्या पुढेच आहे. देशात दररोज साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांतील मृतांची आकडेवारी चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतात काल दिवसभरात तीन लाख ११ हजार १७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ६२ हजार ४३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४,०३७ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
देशात झालेल्या एकूण ४,०३७ मृत्यूंपैकी ९६० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. सध्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी मृत्यूदर वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात काल ५९ हजार ७३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ३४ हजार ८४८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा