घुले यांना जामीन मंजूर – ॲड. गवळी
घुले यांना जामीन मंजूर – ॲड. गवळी
बीड (प्रतिनिधी ):- कारखेल तालुका आष्टी येथिल भा द वि कलम 307  चे प्रकारणात आरोपि शंकर घुले, शिवाजी घुले व प्रकाश घुले यांचा मा. जिल्हा  तीसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बीड यानी जामिन मंजूर केला.
    याबाबत सविस्तर व्रत असे की, अक्षय चौधर रा. कारखेल खुर्द तालुका आष्टी यानी दिनांक 21.4.2023 रोजी पोलिस स्टेशन अंभोरा येथे तक्रार  दिनांक  18.4.2023 रोजी सायंकाली साढ़े सात वाजन्या सुमारास शंकर घुले, शिवाजी घुले व प्रकाश घुले यानी मागिल भंडनाच्या कारणावरूण त्याला, त्याची आई शोभा, मावशी बीजाबाई याना दगड़ाने व लोखंडी गजाने मारहान करुण जख्मी केले. फिरयादी अक्षय चौधर याच्या फिरयादीवरू  शंकर घुले, शिवाजी घुले व प्रकाश घुले यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन अंभोरा येथें गुन्हा क्रमांक ६६/२०२३ नोंद करण्यात आला. सदर आरोपिना दि.२१.४.२०२३ रोजी अटक करण्यांत आली. अरोपीना न्यायालय कोठडित पाठवन्याचा आदेश दिला व आरोपिणी
मा. जिल्हा व तीसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बीड यांच्या न्यायालयत
ॲड.कैलास गवळी यांच्या मार्फत जामिन मिलन्याकरीता आर्ज दाखल केला. सदर आर्जावर आरोपी व सरकार पक्षाची बाजू ऐकून
मा. जिल्हा व तीसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बीड यानी सदर आरोपींचा जामिन अार्ज मंजूर केला. सदर जामिन आर्जामधे   आरोपिंच्या वतीने ॲड.कैलास गवळी यानी युक्तिवाद केला. व जामीन वर सुटका करण्यात आली.असे गवळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा