मोदींचे नेतृत्व विकासाला प्राधान्य देणारे -आ.लक्ष्मण पवार




विकास करणारा मराठवाड्यातला नंबर एकचा आमदार म्हणजे लक्ष्मण पवार : मोहनराव जगताप

मोदी@9 महा जनसंपर्क अभियानातील मन की बात, जेष्ठासोबत स्नेह भोजन, लाभार्थी मेळावा, ५ सत्र संपन्न

गेवराई

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विकासाचा पाठपुरावा करून चांगले काम करणारे लोकप्रतिनिधी आवडतात. त्यामुळे, केन्द्र आणि राज्य सरकारने दिलेला निधी आमदार पवार यांनी इमानदारीने वापरला. टक्के वारी घेणारे अनेक लोकप्रतिधी आपण पहिलेले आहेत. पण, टक्का-टुक्का न घेता प्रमाणीकपणे काम करणारा मराठवाड्यातला नंबर एकचा आमदार म्हणजे लक्ष्मण पवार आहेत. असे गौरवोद्गार भाजपाचा ज्येष्ठ नेते
मोहनराव जगताप यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले आहे. रविवार ता. 18 रोजी गेवराई आमदार लक्ष्मण पवार यांच्या
भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोदी महा जनसंपर्क अभियानाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, देशात मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे वारे वाहत असून,
पाणी, वीज आणि रस्ता काळाची गरज आहे. गेवराई मतदारसंघातल्या विकासाचे श्रेय माझे एकट्याचे नाही.
माझ्या मुळे गेवराई मतदारसंघाचा विकास झालेला नाही. मी केवळ मध्यस्थ आहे. विकासाचे श्रेय, मोदी साहेबांना, शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला आणि
मतदारसंघातील जनतेला आहे. अशी भूमिका आमदार लक्ष्मण पवार यांनी येथे मांडली. ते म्हणाले की, आठ नऊ वर्षाच्या कालखंडात गेवराई मतदारसंघातील विविध
विकासात्मक कामा संदर्भात आलेला कोट्यावधीच्या पैशात एका पैशाची
चोरी करायचा विचार मला स्वप्नात आला नाही. अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त निधी कसा येईल, या कडे लक्ष देऊन, सरकारकडे प्रामाणीकपणे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे, विकासासाठी पून्हा एकदा मोदी यांच्या नेतृत्वाखाली केन्द्रात आणि राज्यात सरकार आणावेच लागेल, असे आवाहन ही आ. पवार यांनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने विकास कामे सुरू झाली. मधल्या काळात आघाडीची सत्ता दोन वर्ष होती. त्या काळात विकासात अडथळा आला होता. मतदारसंघात विकास करायचा असेल तर केवळ रस्ताच नाही तर, पाणी आणि विज महत्त्वाची आहे. हे तीन विषय महत्त्वाचे आहेत. 33 केव्ही केंद्राची गरज आहे. जास्तीत जास्त केन्द्र उभारून शेतीचा प्रश्न मार्गी लागेल. शाश्वत पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नदी जोड प्रकल्प पूर्ण झाल्यास, गोदावरी नदीत 12 महिने पाणी राहील. असे निरिक्षण ही आमदार पवार यांनी शेवटी नोंदविलेदि. १८ जुन रोजी सकाळी मोदी@9 महा जनसंपर्क अभियान सत्र ५ व्या सत्रात जेष्ठासोबत स्नेह भोजन, मन की बात, लाभार्थी मेळाव्याचे आयोजन आ. लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले

यावेळी जेष्ठ नेते श्रीहरी मोटे, मोहन जगताप, प्रकाश सुरवसे, नितीन नाईकनवरे, सतिष पाटील, मदनभाऊ चव्हाण, बाजीराव बोबडे, जे. डी, शहा, सुशील जवंजाळ, राजेद्र राक्षसभुवनकर, दादासाहेब गिरी, ब्रम्हदेव धुरंधरे, राजेद्र भंडारी, भगवानराव घुबार्डे, राहूल खंडागळे, याहीया खान, शाम कुंड, ईश्वर पवार, सचिन वावरे आदि उपस्थितीत होते
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ९ वर्षाच्या कामाचा लेखा जोखा जनते समोर घेऊन जाण्यासाठी दि. ३१ मे ते ३०जुन महिनाभर मोदी@9 च्या महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे दि. ३१ मे रोजी आरंभ रॅली, दि. ४जुन रोजी बुध्दीवंताचे संमेलन, दि. ५ जुन रोजी पत्रकार परिषद, दि. ११ जुन रोजी समाजातील प्रभावी व्यक्तीशी संवाद, व्यापारी संमेलन, विकास तिर्थ,  दि. १८ जुन रोजी जेष्ठासोबत स्नेह भोजन,मन की बात, लाभार्थी मेळावा घेण्यात आला आहे तर २१ जुन रोजी योगदिन, दि.२५ जुन रोजी नरेंद्र मोदी सर्व बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत सर्व कार्यक्रमास नागरिक, पदाधिकारी, मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल मोटे, विष्णुपंत आतकरे, भगवान कदम, जगन पवार, बाबा वाघमारे, कृष्णा पाटोळे, प्रल्हाद येळापुरे, संजय आंधळे, मतिन कुरेशी, राम पवार, लक्ष्मण चव्हाण, शेख निजाम, राजेद्र तापडीया,सय्यद हासन, इम्रान पठाण, किशोर धोडलकर, भरत गायकवाड, बद्दोदीन, बाबासाहेब घोडके, प्रभाकर भालशकंर,शेख ईर्शाद, शौकत पठाण,आदिनी परिश्रम घेतले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा