रिपाइंचा मोर्चाने  शहर निळेमय ! अभूत पूर्व मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला; गोरगरिबांना जमिनीपासून, घरापासून बेदखल होवू देणार नाही – पप्पू कागदे 




रिपाइंचा मोर्चाने  शहर निळेमय ! अभूत पूर्व मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला; गोरगरिबांना जमिनीपासून, घरापासून बेदखल होवू देणार नाही – पप्पू कागदे
बीड
:  जो राबेल कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर या भूमिका प्रमाणे राज्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील गायरान धारक शासकीय जमिनीवर अतिक्रमणी करून व घरे बांधून आपल्या कुटुंबांची उपजीविका भागवीत आहेत. त्यांना घरापासून बेघर करण्यासाठी व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणण्यासाठी शासनाकडून नोटीसा देण्यात येत आहेत. दिलेल्या नोटीसा रद्द करून अन्यायकारक निर्णय मागे घेण्यासाठी तसेच अक्षय भालेराव यांच्या मारेकर्‍यांना फाशी देण्यात यावी. सन 1990 च्या गायरान जमिनी नियमाकुल करण्याचा शासन निर्णयाला 2005 पर्यंत मुद्दत वाढ देण्यात यावी. इंदिरानगर येथील भारत आवचार यांच्या कुटुंबांना न्याय देण्यात यावा.
दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.रंजित इंगळे यांच्या मारेकर्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. परळी पो.स्टेच्या कस्टडीमध्ये मृत्यू पावलेल्या जरीन खान यांच्या कुटुंबियाला न्याय देण्यात यावा. आदी मागण्यांसाठी आज रोजी युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी बोलताना पप्पू कागदे म्हणाले की 1964 पासून कसत असलेल्या जमिनी नियमाकुल करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे समाज कल्याण मंत्री असताना दि. 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990 पर्यंत कसं असलेल्या गायरान जमिनी नावे करण्यासाठी शासन निर्णय लागू केला.
त्यामुळे लाखो हेक्टर जमिनी शासन निर्णय लागू झाल्यापासून गायरान धारक जमिनी नावे काढण्यासाठी पुराव्यासहित प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा करीत आहेत. परंतु मंडळ अधिकारी, तलाठी यांनी गाव पातळीवरील राजकारणाच्या दबावापोटी गाव नमुना व ई-वर नोंदी घेतलेल्या नाहीत. अटी व शर्ती प्रमाणे गायरान जमिनी नियमाकुल करण्याचा आदेश असताना देखील गायरान धारकांची प्रस्ताव तहसील कार्यालय महसूल कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. दलित बहुजन आदिवासी भूमिहीन गोर गरीब समाज बांधवांना जमिनीपासून व घरांपासून बेघर करण्याचा शासन निर्णय गोरगरिबांना उध्वस्त करणार आहे. गोरगरिबांना जमिनीपासून व घरापासून वेदकल होऊ देणार नाही. कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर ही भूमिका शासनाला मान्यच करावी लागेल. नसता या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपाइंच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी जाहीर सभेत दिला. यावेळी अजिंक्य चांदणे, फारुख पटेल, अमर नाईकवाडे, विजय चांदणे, सनी वाघमारे, भारत कांबळे यांच्या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी मझरखान, राजू जोगदंड, किसन तांगडे, मायाताई मिसळे, रेश्माताई जोगदंड, बापू पवार, महेश आठवले,, अविनाश जोगदंड, प्रभाकर चांदणे, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, अड. श्रीकांत साबळे, सुभाष तांगडे, सतीश शिंगारे, नागेश शिंदे, भाऊसाहेब दळवी, शाम वीर, आप्पा मिसळे, दिलीप खंदारे, भीमराव घोडेराव, बिभीषण जावळे, महेश कागदे, धम्मा पारवेकर, मिलिंद पोटभरे, अक्षय कोकाटे, संतराम घोडके, बापू कुचेकर, दीपक अरुण, सचिन वडमारे, पांडुरंग अंकुटे, भैय्यासाहेब मस्के, राम तांगडे , पप्पू वाघमारे, गौतम कांबळे, महेंद्र वडमारे, भैय्यासाहेब साळवे, शहादेव ढोकणे, कुमार अरुण, अण्णासाहेब सोनवणे, प्रकाश वाघमारे, भाऊसाहेब कांबळे, राहुल कांबळे, भैय्या वाघमारे, भाऊसाहेब जावळे, नामदेव वाघमारे, रतन वाघमारे, विशाल इंगोले, राजाभाऊ वक्ते, विनोद शेजवळ, सुदामराव हुंबरे, अशोकवाघमरे, नितीन शिंदे, श्रीमंत जाधव, विजय ओव्हाळ यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते गायरान धारक व घर धारक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा