कु.रिंकल हाडके हिचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश!
कु.रिंकल हाडके हिचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश
सर्वत्र कौतुक होत आहे!
नगर प्रतिनिधि :-
 बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची राज्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. रिंकल हाडके हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहाय्यक व मंत्रालय क्लर्क या परीक्षेमध्ये मुली मधून महाराष्ट्र राज्या मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मार्च 2023 मध्ये झालेल्या सेट परीक्षेमध्येही ती राज्यशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाली तिच्या या दोन्ही यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड.सुरेशराव आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. पी. ढाकणे संस्थेचे विश्वस्त डॉ. बी. ए. चौरे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरुण राख यांनी तिचे अभिनंदन केले. दैनिक मराठवाडा पत्रच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा